राहुरी : अखेर स्थगित कामांना झाली सुरुवात : आ. तनपुरे | पुढारी

राहुरी : अखेर स्थगित कामांना झाली सुरुवात : आ. तनपुरे

राहुरी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील 2515 अंतर्गत 8 कोटी 50 लाख रुपयांच्या विकास कामांना 20 जुलै 2022 रोजी शिंदे- फडणवीस सरकारने स्थगिती दिलेल्या कामांची निविदा प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती माजी राज्य मंत्री, आ. प्राजक्त तनपुरे यांनी दिली. शासनाच्या स्थगिती निर्णयाविरोधात (दि. 12 ऑक्टोंबर 2022) रोजी ग्रामस्थांच्या आग्रहानुसार मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करून दाद मागितली होती. अखेर न्यायालयाने स्थगिती उठवत शिंदे -फडणवीस सरकारला दणका दिल्याचे आ. तनपुरे म्हणाले.

तत्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राहुरी, नगर, पाथर्डी विधानसभा मतदारसंघात 39 विविध विकास कामांसाठी सुमारे 25 कोटी रुपयांची मंजूर मिळाली होती. विविध कामांना प्रशासकीय मंजुरी व कार्यारंभ आदेश मिळाले होते, परंतु राज्यात अचानक सत्ता बदल झाल्याने विद्यमान सरकारने (दि. 20 जुलै 2022) रोजी कामांना स्थगिती दिली.

सरकारच्या या स्थगिती निर्णयाविरोधात आ. तनपुरे व ग्रामस्थांनी औरंगाबाद खंडपीठात (दि.12 ऑक्टोंबर 2022) रोजी याचिका दाखल केली होती. न्यायालयाने याचिकाकर्त्यांच्या बाजूने निकाल देत शिंदे- फडणवीस सरकारला चपराक दिली. मध्यंतरी आ. तनपुरे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांची मुंबई येथे भेट घेऊन या कामास त्वरित चालना द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे केली होती.

दरम्यान, शासनाच्या ग्रामविकास विभागाने निविदा प्रक्रिया सुरू केल्याने विकास कामांचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच या कामांना कार्यारंभ आदेश होऊन प्रत्यक्ष कामास सुरुवात होणार असल्याचे आ. तनपुरे म्हणाले. विकास कामांच्या स्थगितीविरोधात आ. तनपुरे यांनी ग्रामस्थांसमवेत मतदार संघात सायकल यात्रा आंदोलन करीत शासनाचे लक्ष वेधून ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली होती. या अनोख्या आंदोलनाची राज्यभर चर्चा झाली होती.

निंभेरे- कानडगाव रस्ता, बाभुळगाव ते नांदगाव रस्ता, बारागाव नांदूर गावठाण ते ब्रह्मटेक रस्ता, ताहराबाद येथे भैरवनाथ सभा मंडप, संत महिपती महाराज मंदिर वरशिंदे फाटा रस्ता, ताहाराबाद- बेलकरवाडी रस्ता, चेडगाव येथे सतीमाता मंदिर ते तरवडे वस्ती रस्ता, तांभेरे ते भवाळ वस्ती चिंचोली रस्ता, नागरदेवळे येथील अमेयनगर शाळेपासून ते केशरनगर रस्ता, शिंगवे केशव मोरगव्हाण रस्ता, कोल्हार येथे कोल्हुबाई रस्ता, मिरी येथील गुरु आनंद गोशाळा रस्ता, मिरी येथे झोपडपट्टी ते धुमाळा वस्ती रस्ता, मोहोज रस्ता, वाघाचा आखाडा पटारे- चिंतामणी मळा रस्ता, ब्राह्मणी येथे बानकर- गायकवाड वस्ती रस्ता,जुना बाजार तळ देवीचा मळा रस्ता व प्रेमसुख राजदेव वस्ती रस्ता, आरडगाव म्हसे- इंगळे वस्ती रस्ता, तमनर आखाडा- पिंप्री अवघड रस्ता, खडांबे खुर्द रसाळ विटभट्टी रस्ता, भुजाडी वस्ती ते रेल्वे पुल रस्ता, खडी क्रेशर ते कारखाना रस्ता, मल्हारवाडी गागरे वस्ती रस्ता, सात्रळ उजवा कालवा नालकर गीते वस्ती रस्ता, गागरे वस्ती डुकरे डेअरी रस्ता, घोरपडवाडी मंडप, बारागाव नांदूर रोडाई रस्ता, केंदळ बु॥ आरोग्य केंद्र तारडे वस्ती रस्त्यांची कामे होतील.

हेही वाचा

Sangli Crime News : टोळीचा सांगली पोलिसांना बिहारमध्ये गुंगारा

सांगलीपूर्वी कोल्हापूर येथे टाकणार होते दरोडा

अहमदनगर : राष्ट्रवादीत माझी घुसमट सुरू होती! घनश्याम शेलार

Back to top button