कोपरगाव : 7 दुचाकींसह दोन चोरटे केले जेरबंद | पुढारी

कोपरगाव : 7 दुचाकींसह दोन चोरटे केले जेरबंद

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शहरासह तालुक्यात दुचाकी चोरी जाण्याचे प्रमाण वाढल्याने संताप व्यक्त होत आहे. दुचाकी चोरणार्‍या दोन चोरट्यांचा शहर पोलिसांनी छडा लावला. त्यांच्याकडून विविध ठिकाणांवरून चोरलेल्या 7 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. गणेश सिताराम पावले (वय 24 वर्षे, रा. जेऊरपाटोदा) व आकाश जालींदर पवार (वय 21 वर्षे, रा. मुर्शतपूर फाटा, ता. कोपरगाव) अशी आरोपींची नावे आहेत. वेगवेगळ्या ठिकाणांहुन चोरलेल्या 7 मोटारसायकली त्यांच्याकडून जप्त करण्यात आल्या.

कोपरगाव शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत (दि. 1 जून) रोजी रा.8 वाजेच्या सुमारास शहरात जोशीनगर परिसरात ज्ञानेश्वर सैदाने यांच्या घरासमोरुन मोटारसायकल चोरट्यांनी चोरली होती. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता. पो. नि. रामराव ढिकले तपास करीत असताना (दि. 13 जून) रोजी गणेश पावले व आकाश पवार हे दोन आरोपी सापडले. विचारपूस केली असता वेगवेगळ्या ठिकाणांहुन दुचाकी चोरल्याचे त्यांनी कबुली दिली.

त्यांच्याकडुन 7 मोटारसायकली हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. ही कामगिरी पो. अधीक्षक राकेश ओला, अप्पर पो. अधीक्षक स्वाती भोर, उपविभागीय पो. अधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. नि. रामराव ढिकले, पोउनि भरत दाते, रोहिदास ठोंबरे, पोहेकाँ डी. आर. तिकोणे, पो. ना. अर्जुन दारकुंडे, पो. काँ. संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर भांगरे, विलास मासाळ आदींनी यशस्वी केली.

हेही वाचा

काय! सुरवीन चावला कान्समध्ये सूर्यापेक्षा जास्त चमकताना पाहिली का?

पुण्यात मान्सूनच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू नियंत्रण मोहीम

नाशिक अपर आयुक्तालयात होणार खांदेपालट, तब्बल सातशे कर्मचारी बदलीसाठी पात्र

Back to top button