पुण्यात मान्सूनच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू नियंत्रण मोहीम | पुढारी

पुण्यात मान्सूनच्या पार्श्वभूमीवर डेंग्यू नियंत्रण मोहीम

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार मान्सूनच्या पार्श्वभूमीवर राज्यात डेंग्यू आणि चिकनगुनिया नियंत्रण मोहीम राबविली जात आहे. ताप रुग्ण सर्वेक्षण, संशयित रुग्णांच्या नमुन्यांचे संकलन, तपासणी, विविध भागांमध्ये धूरफवारणी या माध्यमातून कीटकजन्य रोगनियंत्रण कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये घट होताना दिसत आहे.

ताप असलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण आरोग्य कर्मचारी, आरोग्यसेविका, आशासेविका यांच्यामार्फत केले जाते. संशयित ताप रुग्णांचे रक्तजल नमुने घेऊन विषाणू परीक्षणासाठी पाठविले जातात. एडिस इजिप्ती डासांचे नमुनेही विषाणूंचा प्रकार ओळखण्यासाठी एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविले जातात. गरजेनुसार उद्रेकग्रस्त भागात धूरफवारणी केली जाते. राज्यात 2021 मध्ये डेंग्यूचे 12 हजार 720 रुग्ण आढळले, तर 42 मृत्यू झाले होते. 2022 मध्ये 8 हजार 578 रुग्ण आढळले व 27 मृत्यू झाले होते. या वर्षी राज्यात 1 हजार 237 डेंग्यूच्या रुग्णांचे निदान झाले असून, एकाही रुग्णाचा अद्याप मृत्यू झालेला नाही.

हे ही वाचा : 

नाशिक : चंद्रशेखर रावांनी उचलला कांदा, महाराष्ट्रात सत्ताधारी-विरोधकांचा वांधा

पुणे : सराईत कडून 4 लाखांचे दागिने जप्त

Back to top button