अहमदनगर : संत निवृत्तीनाथांचा आज संजीवन समाधी सोहळा | पुढारी

अहमदनगर : संत निवृत्तीनाथांचा आज संजीवन समाधी सोहळा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्याचे आज नगरमध्ये रामकृष्ण हरीच्या गजरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. महापालिका, बाजार समिती व हमाल पंचायतीतर्फे जोदार स्वागत करण्यात आले. आज निवृत्ती नाथांचा संजीवन समाधी सोहळा मार्केट यार्ड येथे होणार आहे. अखंड हरीनामाचा गजर करीत आज शेकडो वर्षांची परंपरा असलेली संत निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर पालखी सोहळ्याचे आज नगरमध्ये माऊली गजरात स्वागत करण्यात आले. वांबोरीमार्गे दिंडी नगरमध्ये आली.

नगर-छत्रपती संभाजीनगर रस्त्यावर महापालिकेसमोर महापौर रोहिणी शेंडगे, आयुक्त डॉ. पंकज जावळे, अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रदीप पठारे, आस्थपना विभागप्रमुख अशोक साबळे, आसाराम कावरे यांनी पालखीचे स्वागत केले. तर, स्टेशन रस्त्यावरील बाजार समितीमध्ये संत निवृत्तीनाथ पालखी सोहळ्याचे हमाल पंचायतीचे जिल्हाध्यक्ष अविनाश घुले, कोतवालीचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, गोविंद सांगळे, मधुकर केकाण, अशोकराव बाबर, विष्णुपंत म्हस्के, सतीश शेळके, रवींद्र भोसले, राम पानसंबळ, संजय घुले यांनी स्वागत केले. बाजार समितीच्या वतीने जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी पालखीला खांदा देऊन स्वागत केले.

यावेळी यावेळी बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, उपसभापती रभाजी सूळ, संचालक संतोष म्हस्के सुधीर भापकर, सचिन सातपुते, संजय काळे उद्योजक संजय चोपडा यांच्यासह वारकरी उपस्थित होते. हमाल पंचायत व बाजार समितीच्या वतीने एकादशीनिमित्त वारकर्‍यांना केळी, खिचडी, खजूर असा प्रसाद देण्यात आला. दरम्यान, आज रात्री हरिपाठ, कीर्तन होणार असून, उद्या सकाळी 10 ते 12 यावेळेत संत निवृत्तीनाथांचा संजीवनी समाधी सोहळा होणार आहे. सुमारे पाच ते सहा लाख वारकर्‍यांना उद्या मिष्टानाचे जेवण देण्यात येणार आहे.

गेल्या चाळीस वर्षांपासूनची परंपरा जपत हमाल पंचायत व बाजार समितीतर्फे दिंडी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. वारकर्‍यांना फराळ देण्यात आला. उद्या संजीवन समाधी सोहळा होणार आहे.

– अविनाश घुले, जिल्हाध्यक्ष, हमाल पंचायत

 हेही वाचा

नीट परीक्षेत विद्यार्थ्यांची ‘मायमराठी’कडे पाठ !

पेरण्या लांबणीवर; लांबलेल्या मान्सूनचा परिणाम

पुणे : डॉ. अनिल रामोडचा येरवडा कारागृहातील मुक्काम वाढला ; जामीन अर्जावर उद्या सुनावणीची शक्यता

Back to top button