संगमनेरात काहीजणांचा हेतू पुरत्सर दंगली घडविण्याचा प्रयत्न  : आ थोरात ; निळवंडे च्या पाण्याचे केले पूजन

संगमनेरात काहीजणांचा हेतू पुरत्सर दंगली घडविण्याचा प्रयत्न  : आ थोरात ; निळवंडे च्या पाण्याचे केले पूजन

संगमनेर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  एका बाजूला निळवंडेच्या डाव्या कालव्याला पाणी आल्यामुळे शहरासह तालुक्यातील दुष्काळी भागात आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस होता. मात्र दुस ऱ्या बाजूला संगमनेर शहरात जाती धर्मामध्ये वाद लावून देत दंगली कशा घडतील याचा हेतू पुरस्कर काहींचा प्रयत्न केला असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विधि मंडळ पक्षनेते माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे नाव न घेता केला.

निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची चाचणी घेतल्यानंतर ते पाणी डाव्या कालव्याद्वारे संगमनेर तालुक्यातील दुष्काळी भागात दाखल झाले त्यानिमित्ताने निळ वंडे येथे कालव्यातून आलेल्या पाण्याचे पूजन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी दुष्काळी भागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या संकल्पपूर्ती मेळाव्यात आ थोरात बोलत होते.

या मेळा व्याला माजी आ डॉ सुधीर तांबे माजी नग राध्यक्ष दुर्गा तांबे सामाजिक कार्यकर्त्या कांचन थोरात एकवीरा फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ जयश्री थोरात जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधव कानवडे सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ संचालक इंद्रजीत थोरात संगमनेर दूध संघाचे चेअरमन रणजीत देशमुख शेतकी संघाचे अध्यक्षसंपत डोंगरे माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे युवा काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष सांगळे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आ. थोरात म्हणाले, की "जर एखाद्याने गुन्हा केला असेल तर त्याला जरूर शिक्षा कडक शिक्षा झाली पाहिजे. परत त्याची गुन्हा करण्याची हिंमत झाली नाही पाहिजे अशी शिक्षा द्या."  विनाकारण एखाद्या ला दोषी धरू नका असा सल्ला देत ते म्हणाले की संगमनेर शहरात दंगली कशा घडतील आणि त्यातून वातावरण कसे खराब होईल यासाठी काहींचा प्रयत्न सुरू होता आणि त्यातून मोर्चे घडविले गेले.  आता काही जण तुमचे संसार मोडायला लागले आहे हे असे तसे मोडत नाही तर वेगळ्या पद्धतीने मोडू असा ही त्यांचा प्रयत्न सध्या सुरू आहे. त्यामुळे तरुणांनी हे ओळखणे गरजेचे आहे.' सध्या विकासाचे राजकारण न करता जाती-धर्माचे राजकारण करून मते मिळवायची हा सध्या विरोधकांचा कार्यक्रम सुरू असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. सध्या धर्म ही अफुची गोळी आहे ती आपल्याला तर बसली नाही ना याची काळजी प्रत्येकाला घ्यावी लागेल. एखाद्याचे जर चुकत असेल तर त्याला जरूर शिक्षा झाली पाहिजे परंतु सर्वच समाजाला दोषी धरणे अजिबात बरोबर नाही असे ठणकावून सांगितले.

आ थोरात म्हणाले की संगमनेर तालुक्याच्या दुष्काळी भागातील शेतकरी ३० ते ते ३५ वर्षापासून निळवंडे कालव्यांने पाणी येईल अन पिढ्यानपिढ्या जे स्वप्न पाहत होते ते स्वप्न पाटाला पाणी आल्या नंतर खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे निळ वंडेचे पाणी दुष्काळी भागात आले आहे हा आपल्या सर्वांच्या दृष्टीने आनंदाचा आणि भाग्याचा तर माझ्यासाठी तर हा सोन्याचा दिवस आहे हा दिवस तर संगम नेर तालुक्याच्या इतिहासात सुवर्ण अक्ष रांनी लिहिला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

डॉ सुधीर तांबे म्हणाले की, 'निळवंडे धरण होऊ नये म्हणून आत्ताचे श्रेय घेणा ऱ्यांनी विरोध केला आहे. मात्र बाळासो थोरात यांनी आपली राजकीय प्रतिष्ठा पणाला लावली आणि निळवंडे व काल व्यांची कामे पूर्ण केले. या निळवंडे धरणाचे व कालव्यांचे काम काँग्रेस सरकारच्या काळात झाले.' भाजपच्या काळात निधी मिळाला नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष माधव कानवडे म्हणाले की, 'भावनेच्या आहारी जाऊ नका तुमचा विकास कोण मोडू पाहत आहे ते ओळखा आणि कोण आपले आहे अन कोण नाही हे ओळखा.' डॉ जयश्री थोरात यावेळी बोलताना म्हणतात की,  माझे वडील आ बाळा साहेब थोरात यांनी कधीच जाती धर्माचे राजकारण न करता विकासाचे राजकारण केले आहे. काही जण या निळवंडे कामाचे श्रेय घेत आहे मात्र या निळवंडेचे खरे श्रेय कुणाचे आहे हे जनतेला माहीत आहे. त्या मुळे खऱ्या अर्थाने माझे वडील निळवंडे चे खरे जलनायकच आहेत.'  निळवंडे कालव्यांचे काम चालू असतानाचा जलनायक आमदार बाळासाहेब थोरात हे प्रत्यक्ष कामावर जाऊन पाहणी करत होते मात्र आता श्री घेणाऱ्यांनी कालव्यांची कामे चालू असतानाचा एखादा तरी फोटो दाखवा मग म्हणा की आमच्यामुळे झाले असा टोला माजी जिल्हा परिषद सदस्य महेंद्र गोडगे यांनी विरोधकांना लगावला.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याची अध्यक्ष प्रतापराव ओहोळ यांनी केले सूत्रसंचालन नामदेव हदडळ यांनी केले तर आभार संगमनेर तालुका दूध संघाचे चेअरमन रणजित देशमुख यांनी मानले.

तुम्ही मोडायला आले आम्ही घडवायला चाललो : आ थोरात
तुम्ही आमच्या संसार मोडायला लागले तर आम्ही तुमचा मोडायला नव्हे तर घडवायला गेलो आहे. एखाद्या भागात चांगले असेल तर चैतन्य पाहायला मिळते. परंतु बंद पडलेल्या कारखान्याच्या भागात जर गेला तर असे उदास चैतन्यहीन आणि एखादं माणूस मेल्यासारखं वाटतं दिसते त्या भागातील शेतकऱ्यांचा ऊस संगमनेरला आणला जातो. त्यामुळे त्याभागातील शेतकऱ्यांचे शेतकऱ्यांच्या जीवनात चैतन्य निर्माण करण्याचे काम आपण करणे हे आपले कर्तव्य आहे. म्हणून गणेश नगर भागातील शेतकऱ्यांचे जीवन घडविण्या साठी आपण गणेश कारखान्याची निवडणूक लढवित असल्याचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

संगमनेर व अकोले तालुक्यात प्रकल्प ग्रस्त वसविले मात्र शेजारी पाजा-यांनी मात्र कोणीही प्रकल्पग्रस्तना एक इंच ही जमिनी दिल्या नाही.  मी पाटबंधारे राज्य मंत्री होतो आणि पटबंधारे मंत्री पदमसिंह पाटील होते त्यावेळी मी त्यांच्या उस्मानाबाद जिल्ह्याचा पालकमंत्री होतो आणि त्यांच्याकडून धरणाच्या कामासाठी पैसे मिळविण्यासाठी पळालो मात्र सध्याचे पालकमंत्री किती कर्तृत्ववान आहेत हे आपल्याला अलकडील काळात कळायला लागले आहे,असा टोला काँग्रेसचे माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी भाजपचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना लगावला.

हे ही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news