नगरमधील सोनई ग्रामपंचायतीला 75 लाखांचे बक्षीस | पुढारी

नगरमधील सोनई ग्रामपंचायतीला 75 लाखांचे बक्षीस

सोनई : पुढारी वृत्तसेवा :  माझी वसुंधरा अभियानांतर्गत भूमी, जल, वायू, अग्नी व आकाश या निसर्गाशी संबंधित पंचतत्त्वावर आधारित स्थानिक स्वराज्य संस्थांची स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत ग्रामपंचायत गटामध्ये सर्वोत्तम कामगिरी सोनई ग्रामपंचायतीस जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मुबई येथे गौरवण्यात आले. सोनई ग्रामपंचायतीस महाराष्ट्र राज्य पर्यावरण वातावरणीय बदल विभाग आणि माझी वसुंधरा अभियान संचालनालय यांच्या वतीने विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते मुंबई येथे सोमवार दि. 6 जून रोजी गौरवण्यात आले. सरपंच धनंजय वाघ, उपसरपंच प्रसाद हारकळे व ग्रामसेवक संदीप वाडेकर व बाळासाहेब जाधव यांनी 75 लाख रुपयाचे बक्षीस स्वीकारले.

सोनई ग्रामपंचायतीने भूमी क्षेत्रात उत्कृष्ट काम करून नाशिक विभागात प्रथम क्रमांक सलग दुसर्‍या वर्षीही मिळवला असल्याबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांच्या प्रेरणेने व माजी मंत्री शंकरराव गडाख, माजी सभापती सुनील गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत पर्यावरणाविषयी उपक्रम राबवीत आहे. मुळा एज्युकेशन, सर्व शाळा, सामाजिक संस्था, ज्येष्ठ नागरिकांसह यशवंत सामाजिक प्रतिष्ठान वाढदिवसाच्या दिवशी मोरेचिंचोरे येथे वाढदिवसाला एक झाड उपक्रम राबविण्यात येत असतो. या सर्व उपक्रमांमुळे मुळा संस्था ते घोडेगाव व शिंगणापूरपर्यंत दुतर्फा, मुळा संस्थेच्या परिसरात झाडे लावली व त्याचे संगोपन केल्यामुळे परिसर हिरवाईने दाटून गेला आहे.

सोनई ग्रामपंचायतीला मिळालेला पुरस्कार हा ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी लावलेल्या रोपट्याचे मिळालेले फळ आहे. तसेच आमदार शंकरराव गडाख व माजी सभापती सुनील गडाख यांच्या मार्गदर्शनामुळे हा सन्मान मिळालेला आहे. त्यामुळे हा सन्मान संपूर्ण ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि आपल्या पूर्ण गावाचा सन्मान आहे.
                                                      – धनंजय वाघ, सरपंच, सोनई

 

हे ही वाचा : 

https://pudhari.news/sports/564039/naushad-became-the-most-expensive-player-in-maharashtra-premier-league/ar

https://pudhari.news/maharashtra/mumbai/564126/mumbai-news-murder-of-live-in-partner-in-mumbai/ar

https://pudhari.news/national/563998/manipur-violence-ambulance-attack-by-mob-imphal-boy-mother-killed/ar

Back to top button