तहसील आवार की जनावरांचा गोठा..! कोपरगावची बिकट अवस्था | पुढारी

तहसील आवार की जनावरांचा गोठा..! कोपरगावची बिकट अवस्था

महेश जोशी

कोपरगाव(अहमदनगर) : येथील तहसील कार्यालयाचे आवार मुक्त, मोकार जनावरांचा गोठा अथवा कोंडवाडा बनल्याचे चित्र पहायला मिळते. मोकाट पाळीव प्राण्यांचा बंदोबस्त कधी होणार, अशी सातत्याने विचारणा होत. तहसीलदार व पालिका मुख्याधिकारी यावर कधी नियंत्रण आणणार, असा सवाल विचारला जात आहे. तहसील कार्यालयाच्या आवारासह शहरातील विविध प्रभागात मुख्य रस्त्यावर पाळीव प्राण्यांचा मुक्त संचार, तर दुसरीकडे गाढव मोकाट फिरतात. स्वच्छतागृहेच अस्वच्छगृह बनली. बेशिस्तीने वाहने लावण्याचे प्रमाण वाढले आहे. चकचकीत फरशांवर प्रचंड डाग, त्यावर गुटख्याच्या पिचकार्‍या मारून विविध नकाशे तयार केले आहेत.

अधिकारी बदलून गेले, पण पाट्या तशाच आहेत, रेकॉर्ड अस्तवस्त, पिण्याच्या पाण्याचा वानवा, लघुशंकेसाठी जायची सोय नाही, आहे ती स्वच्छता ग्रह तीव्र दुर्गंधीच्या घम- घमाटाची बनल्याने अक्षरशः नाकाला रुमाल लावून जाण्याची वेळ विविध प्रशासकीय इमारतीत दिसत आहे. वाळू वाहनांचे भंगार, हे सगळे दृष्य कोपरगाव तहसील कचेरीत पहायला मिळते. सन् 2013-14 मध्ये कोपरगाव तहसील कार्यालयाची इमारत तयार झाली.

तेव्हापासून बांधकाम कार्यालयासह तहसीलदार यांच्या कार्यालयातील फर्निचरच्या फाईलचा शोध लागला नाही. सात- आठ वर्षे उलटली, पण यात कार्यालयीन व्यवस्थेसाठी बसलेल्या अधिकार्‍यांना सुस्थितीत फर्निचर मिळाले नाही. हे फर्निचर मुंबईच्या मंत्रालय मॉलमधून आणून पडल्याचे समजते. कोपरगाव शहर व विधानसभा मतदारसंघातील 89 गावांतील दैनंदिन कामासाठी येथे येणारा प्रत्येक नागरीक विचारत आहे. कोपरगाव तहसील कार्यालय म्हणजे अस्वच्छतेचा ठेवा आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वच्छतेचा संदेश देतात. त्याला प्रतिसाद म्हणून सनदी अधिकारी व त्यांचा प्रचार करणारे प्रचारक फक्त डोळ्यांसमोरचं फोटो काढून वाऽऽ हवा मिळवतात, पण खरी साफ सफाई, स्वच्छता कधीच करीत नाही. हातात फक्त झाडू असतो अन स्वच्छतेचे नाटक काही मंडळी करते.

तहसील कार्यालयाची प्रत्येक भिंत ही सूजाण नागरीकाच्या गुटखा अन् पान खाण्याच्या सवयी दर्शवितात. गाढव, भटकी कुत्री अन् वाहने हे तिन्हीही मोकाटपणे येथेचं पहायला मिळतात. कोपरगावच्या वैभवात भर घालणारी ही वास्तु राहली नसून, केवळ घाणीचे साम्राज्य येथे पहायला मिळते. एरवी, -जिल्हाधिकारी कोपरगावी येणार असले की, चकाचक आठवडा पहायला मिळतो. जिल्हाधिकार्‍यांनी पाठ फिरवली की अस्वच्छता जाणवते, याला शिस्त कोण आणि कशी लावणार, हा खरा प्रश्न आहे.

‘दाम करी काम’ अशी बिकट परिस्थिती..!

महसूल कार्यालयाशी संबंधित विविध कार्यालयांमध्ये ‘दाम करी काम’ अशी बिकट परिस्थिती दिसते. चिरीमिरी दिल्याशिवाय कामचं होत नाही. गोरगरीब, वृद्ध नागरीक महिला चकरा मारून-मारुन जर्जर झाले,परंतु संबंधित विभागाचे कर्मचारी असले तर साहेब नसतात, साहेब असले की, कर्मचारीच जागेवर नसतात. यामुळे या मोठ्या समस्या कधी सुटणार, असा यक्षप्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत कपाळावर हात मारीत आहेत.

हेही वाचा

राहाता नगरपालिकेत डिझेलचा गैरव्यवहार उघडकीस?

कर्नाटकात मोफत बस प्रवासासाठी महिलांना आधार कार्ड अनिवार्य

अहमदनगर : शेतकर्‍यांचे सरकार येताच ‘गणेश’ चा करार : खा. डॉ. सुजय विखे पा

Back to top button