दहावीचे मैदानही मुलींनीच गाजविले! अहमदनगर जिल्ह्याचा निकाल 94 टक्के | पुढारी

दहावीचे मैदानही मुलींनीच गाजविले! अहमदनगर जिल्ह्याचा निकाल 94 टक्के

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत यामध्ये नगर जिल्ह्याचा निकाल 93.90 टक्के लागला असून, यात 91.97 टक्के मुले आणि 96.36 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या. बारावीप्रमाणे दहावीचे मैदानही मुलींनीच गाजविल्याचे या निकालावरून स्पष्ट झाले आहे. हा निकाल शुक्रवारी (दि. 2) दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत (96.57 टक्के) या वर्षी जिल्ह्याचा निकाल तीन टक्क्यांनी घसरल्याचे चित्र आहे.

इयत्ता दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या कालावधीत झाली. जिल्ह्यात कॉपीमुक्त परीक्षेसाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक कडूस व भास्कर पाटील या दोन्ही शिक्षणाधिकार्‍यांनी भरारी पथकांच्या माध्यमातून मोहनत घेतली. त्यामुळे यंदाची परीक्षा बर्‍याच अंशी कॉपीमुक्त झाल्याचे पाहायला मिळाले. शुक्रवारी दुपारी एक वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर झाला.

पुणे विभागात नगर तिसर्‍या स्थानावर!

पुणे विभागात बारावीनंतर दहावीतही सोलापूरनेच बाजी मारली. सोलापूर जिल्ह्यातील 63972 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यातील 61152 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकालाची टक्केवारी 95.59 आहे. दुसर्‍या स्थानावर पुणे जिल्हा आला आहे. येथील 1 लाख 33 हजार 489 मुलांनी दहावीची परीक्षा दिली. त्यातील 1 लाख 26 हजार 551 (94.80 टक्के) विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नगर जिल्हा दहावीत तिसर्‍या स्थानावर फेकला गेला आहे. येथील परीक्षा दिलेल्या 68879 विद्यार्थ्यांपैकी 93.90 टक्के म्हणजे 64682 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

फ्रेश निकाल
विद्यार्थी उत्तीर्ण टक्के
67874 64132 94.48

रिपीटर निकाल
विद्यार्थी उत्तीर्ण टक्के
1005 550 54.72

एकूण निकाल
विद्यार्थी उत्तीर्ण टक्के
68879 64682 93.90

अनुत्तीर्ण आकडेवारी
मुले ः 3095
मुली ः 1102

संवर्ग परीक्षा दिली उत्तीर्ण टक्केवारी
मुली 30301 29199 96.36
मुले 38578 35483 91.97

निकालात आघाडीवर
श्रीगोंदा ः 96.52

निकालात पिछाडीवर
पाथर्डी ः 91.23

हेही वाचा :

निरा-देवघर कालव्यासाठी 500 कोटींची निविदा; खासदार नाईक-निंबाळकर यांची माहिती

देशातील पहिला कचर्‍यातून हायड्रोजन निर्मितीचा प्रकल्प पुण्यात !

इंदापूर : विजेच्या तारांना स्पर्श झाल्याने ट्रॉलीला आग

 

Back to top button