नगर जिल्ह्यातील 10 हजारांवर उमेदवार देणार ‘एमपीएससी’ | पुढारी

नगर जिल्ह्यातील 10 हजारांवर उमेदवार देणार ‘एमपीएससी’

नगर, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवारी (दि.4) अहमदनगर जिल्ह्यातील 29 उपकेंद्रावर होणार आहे. जिल्ह्यातील 10 हजार 368 उमेदवार परीक्षा देणार आहेत.

या परीक्षेसाठी दोन पेपर असून, पहिला पेपर सकाळी 10 ते दुपारी 12 तर दुसरा पेपर दुपारी 3 ते 5 वाजता या वेळेत घेण्यात येणार आहे. या परीक्षेच्या व्यवस्थेसाठी जिल्हा प्रशासनाने एकूण 954 अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती केली आहे. यामध्ये उपजिल्हाधिकारी संवर्गातील समन्वय अधिकारी-8, भरारी पथक प्रमुख-1, उपकेंद्र प्रमुख- 29 अधिकारी तसेच पर्यवेक्षक, सहायक, समवेक्षक, मदतनीस यांचा समावेश आहे.

उमेदवारांना परीक्षा केंद्रावर सकाळी 8.30 वाजता प्रवेश देण्यात येणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रत्येक उपकेंद्रावर पुरेसा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. परीक्षा उपकेंद्राच्या 100 मीटर परिसरातील एसटीडी बुथ, फॅक्स मीटर, झेरॉक्स दुकाने सकाळी 7 वाजेपासून ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. प्रवेश प्रमाणपत्रे उमेदवारांनी स्वतः आयोगाच्या वेबसाईटवरून डाऊनलोड करून घ्यावयाची आहेत. दुय्यम प्रवेश प्रमाणपत्रे जिल्हाधिकारी कार्यालयामधून देण्यात येणार नसल्याचे परीक्षेचे केंद्रप्रमुख तथा आरडीसी राजेंद्रकुमार पाटील यांनी म्हटले आहे.

हेही वाचा:

Maharashtra Board SSC Result: दहावीचा निकाल जाहीर, 93.83 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

नगरचे नामांतर झाले, विभाजनाचे काय..?

नगर: वाढत्या उन्हाने जिवाची होतीय काहिली, दुपारी रस्ते निर्मनुष्य; विजेचा लपंडाव जेरीस आणणारा

 

Back to top button