

नगर, पुढारी वृत्तसेवा: जुन्या महापालिकेच्या सभागृहाला आग लागल्यानंतर त्याची अद्यापि दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यातच आज नव्या महापालिका इमारतीतील राजमाता जिजाऊ सभागृहात आस्थापना विभागाची बैठक सुरू असताना शॉर्टसर्किट झाले. कर्मचारी लगेच बाहेर पळाले. मेन स्वीच बंद करण्यात आला आणि अनर्थ टळला.
जुन्या महापालिका इमारतीतील सभागृहाला सुमारे दहा वर्षांपूर्वी आग लागली होती. त्यात नगरकरांचा वारसा जळून खाक झाला. त्या सभागृहाचे पुनर्निर्माण करावे, अशी माणगी अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, अद्यापि त्याचा सकारात्मक विचार झालेला नाही. त्यात आज नव्या इमारतीतील राजमाता जिजाऊ सभागृहात आस्थापना विभागाची बैठक सुरू असतानाच शॉर्टसर्किट झाले. त्यामुळे अधिकार्यांसह कर्मचार्यांची धावपळ सुरू झाली. पळताना काही महिला कर्मचारी पडल्याने किरकोळ जखमी झाल्या. काही कर्मचार्यांनी तत्काळ मेन स्वीच बंद केल्यानंतर अपघात टळला.
नंतर आस्थापना विभागाची बैठक स्थायी समितीच्या सभागृहात झाली. त्यानंतर विद्युत विभागाच्या कर्मचार्यांनी शॉर्टसर्किटचे कारण शोधून दुरुस्ती केली. दरम्यान, सभागृहातील शॉर्टसर्किटमुळे विद्युत विभागाचा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला.
महापालिकेत विविध ठिकाणी विद्युत विभागाकडून विजेचे मेन बोर्ड लावण्यात आले आहेत. त्यातील काही बोर्ड पिण्याच्या पाण्याच्या कूलरजवळ बसविण्यात आलेले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यापासून अपघाताचा धोका आहे.
हेही वाचा: