शेवगावच्या 44 दंगेखोरांची न्यायालयीन कोठडीत रवानगी | पुढारी

शेवगावच्या 44 दंगेखोरांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

शेवगाव तालुका(अहमदनगर); वृत्तसेवा : शेवगाव येथील दंगलीतील 44 दंगेखोरांना आज न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यातील 7 जणांना खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. शेवगाव शहरात गेल्या रविवारी (दि. 14) झालेल्या दंगलीत दंगल करणार्‍यांची पोलिसांनी धरपकड सुरू केल्यानंतर 47 दंगेखोरांना अटक केली. यातील 44 आरोपींची पोलिस कोठडी संपल्याने आज रविवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले.

यापैकी आरेज नजीर पठाण, मतीन युसुफ शेख, इम्रान दिलावर पठाण, सलाउद्यीन हाशमोद्यीन शेख, रिजवान आयुब पठाण, फिरदोस फारुक पठाण (सर्व रा. नाईकवाडी मोहल्ला, शेवगाव), अमर मुस्तफा शेख (भगूर, ता. शेवगाव) या आरोपींना अंकुश अशोक पातकळ यावर झालेल्या खुनी हल्ल्याच्या गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. त्यात आणखी कोण आहेत हे निष्पन्न करण्यासाठी पोलिस तपास करीत आहे. याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. दरम्यान, जाकीर अब्बास पठाण, सोहेल अकबर शेख, शरफराज हुसेन शेख यांना सोमवारपर्यंत (दि.22) पोलिस कोठडी देण्यात आली असून, त्यांना पुन्हा सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.

Back to top button