नगर : टेम्पोच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू | पुढारी

नगर : टेम्पोच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

वाळकी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  भरधाव वेगाने चाललेल्या टेम्पोने रस्ता ओलांडणार्‍या पादचार्‍याला जोराची धडक दिल्याने गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नगर – पुणे महामार्गावर कामरगावच्या (ता.नगर) शिवारातील अभिजित मंगल कार्यालया समोर बुधवारी (दि.10) दुपारी घडली. अशोक खंडू सोनवणे (वय 59, रा. बेल्हे, ता. जुन्नर जि.पुणे), असे त्याचे नाव आहे. सोनवणे बुधवारी दुपारी साडेबारा वाजता नगर – पुणे महामार्गावर कामरगाव शिवारातील अभिजित मंगल कार्यालया समोर रस्ता ओलांडत होते.

यावेळी चालकाने टेम्पो (एमएच 20 सीटी 7123) भरधाव वेगात चालवत सोनवणेंना जोराची धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, सोनवणे रस्त्यावर लांब फेकले गेले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. याबाबत त्यांचा मुलगा सचिन सोनवणे याने गुरुवारी (दि.11) नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. यावरून पोलिसांनी टेम्पो चालक जावेद पठाण विरोधात गुन्हा दाखल केला.

Back to top button