अकोले : हरिश्चंद्रगड अभयारण्यात 54 शेकरू; राज्यप्राण्याच्या संख्येत वाढ

अकोले : हरिश्चंद्रगड अभयारण्यात 54 शेकरू; राज्यप्राण्याच्या संख्येत वाढ
Published on
Updated on

अकोले(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचा राज्य प्राणी अशी ओळख असलेल्या दुर्मिळ शेकरुंची संख्या वाढली आहे. तालुक्यातील हरिश्चंद्रगड अभयारण्यात प्रामुख्याने कोथळे, पाचनई, आंबित, कुमशेत या परिसरातील जंगलात तब्बल 54 शेकरु आढळले. दरम्यान, राजूर -हरिश्चंद्रगड अभयारण्यात शेकरुंची संख्या गतवर्षीच्या तुलनेत वाढल्याचे शेकरुच्या प्रगणनेतून दिसत आहे.

तालुक्यातील राजूर हरिश्चंद्रगड अभयारण्यात महाराष्ट्राचा राज्यप्राणी शेकरूंची पंधरा दिवसांच्या प्रगणनेत मोजदाद वन्यजीव विभागाच्या कर्मचार्‍यांकडुन करण्यात आली. 54 शेकरूंनी वन कर्मचार्‍यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. राजूर वनपरिश्रेत्रात 3 वन परिमंडळात जंगलात ही प्रगणना राबविण्यात आली. नाशिक वन्यजीव विभागाच्या अखत्यारित अ. नगर जिल्ह्यात कळसुबाई, हरिश्चंद्रगड अभयारण्य शेकरुंच्या अधिवासासाठी प्रसिद्ध आहे.

दरवर्षी राजूर, भंडारदरा वनपरिक्षेत्रांमध्ये शेकरुंच्या प्रगणनेचा उपक्रम वन्यजीव विभागामार्फत राबविला जातो. उपवनसंरक्षक राजेंद्र हिरे, सहाय्यक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांच्या आदेशान्वये राजूर वनपरिक्षेत्रांतर्गत वनपरिक्षेत्र अधिकारी दत्तात्रय पडवळे यांच्या पथकातील वनपाल शंकर लांडे, हनुमंता इदे , नवनाथ गांगोडे, खाडे, वनरक्षक गोविंद आधार ,प्रकाश आढळ, वनरक्षक दत्तू डोंबाळे, चंद्रकांत चव्हाण, अविनाश भोये, निलेश पिचड , गंगाराम पालवी, प्रविण साळुंखे यांनी जंगलात प्रगणना केली.

आदिवासींच्याया मदतीने शेकरुंचे येथे वास्तव्य दिसते. यावर्षी अभयारण्यात शेकरुंनी बांधलेल्या घरट्यांची संख्या 260 आढळली. नव्या घरट्यांची संख्या वाढल्याचे दिसते. जुने 185 घरटे आढळले. शेकरुंनी 61 घरटे सोडल्याचे समोर आले आहे. गतवर्षी सोडलेल्या जुन्या घरट्यांची संख्या जास्त होती, मात्र यावर्षी वापरलेल्या जुन्या घरट्यांचा आकडा त्या तुलनेत जास्त आहे. ही दिलासादायक बाब मानली जाते. यामुळे शेकरुंचा अभयारण्य अधिवास समृद्ध होत असल्याचे मानले आहे.

अशी झाली शेकरूची प्रगणना

अकोले तालुक्यात राजूर -हरिश्चंद्रगड अभयारण्यातील झाडांवर क्रमांक टाकण्यात आले. जीपीएस रीडिंग घेत शेकरुच्या झाडावर अधिवासाबाबतचे निरीक्षण वनपाल, वनरक्षक, वनमजूरांकडून नोंदविण्यात आले. राजूर वनपरिक्षेत्रातील तीनही वन परिमडाळांमध्ये सुमारे 15 दिवस गणना करण्यात आली. पाच घरटे म्हणजे एक शेकरूचे वास्तव्य याप्रमाणे मोजदाद करण्यात आली.

आंब्यासह विविध झाडांना शेकरूंची पसंती..!

कोंथळे, लव्हाळी, कोतुळ, अंबित, तळे, पाचनई, कुमशेत भागात जंगलांमध्ये प्रत्यक्ष दिसणार्‍या शेकरुंसह त्यांच्या घरट्याचे निरीक्षण केले. 54 शेकरुंनी प्रत्यक्ष दर्शन दिले. आंबा, चांदा, करंबु, आळीव, करप, जांभूळ, हिरडा, कोभोळ, आवळा, उंबर, येहळा, गेळ, शंदरी, लोध, गुळचाई, पिंपर, अशिद, लांद या झाडांना शेकरूंची पसंती असल्याचे दिसले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news