नगर जिल्ह्यात 54.37 लाख मे. टन उसाचे गाळप

नगर जिल्ह्यात 54.37 लाख मे. टन उसाचे गाळप
Published on
Updated on

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  अ.नगर जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांनी 6 जानेवारीपर्यंत 54 लाख 37 हजार 204 मे टन उसाचे गाळप केले. त्यापासून 49 लाख 10 हजार 380 साखर पोत्यांचे उत्पादन घेतले आहे. दरम्यान, दैनंदिन साखर उतारा 10.47 असा आहे.
नगर जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप मे टनात, साखर पोते व दैनंदिन साखर उतारा पुढीलप्रमाणे, अंबालिका (8 लाख 19 हजार 350 मे. टन), (8 लाख 11 हजार 150 साखर पोते) (11.04 साखर उतारा), मुळा (532110) (371600), (11.04), थोरात (522950) (572990), (13.00), ज्ञानेश्वर (572750) (511950) (10.90), सहकार महर्षि नागवडे श्रीगोंदा (392900) (374375), (10.84), पद्मश्री विखे पा. (416650) (315250), (11.20), कुकडी (313400) (300800), (10.63), अशोक (284260) (274000) (11.55), सहकार महर्षी शंकरराव कोल्हे (311187) (240825), वृध्देश्वर (202835) (196250) (11.25), अगस्ती (215161) (217110), (11.33), कर्मवीर शंकरराव काळे (211071) (217900), (11.75), गंगामाई (458250) (339650) (10.92), गणेश (61300) (50250) (11.00), पियुष (123230) (116280) (10.62) याप्रमाणे उसाचे गळीत झाल्याचे सांगण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news