राहुरी : वृद्धेसह नातवास कुर्‍हाड दाखवून 40 हजारांची लूट | पुढारी

राहुरी : वृद्धेसह नातवास कुर्‍हाड दाखवून 40 हजारांची लूट

राहुरी(नगर); पुढारी वृत्तसेवा : आजीसह नातवाला कुर्‍हाडीचा धाक दाखवून चोरट्यांनी आजीच्या अंगावरील 7 ग्रॅम वजनाचे दागिने ओरबाडले. 40 हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांसह बोकड घेऊन चोरटे अंधारात पसार झाले. ही घटना राहुरी तालुक्यातील मुळानगर येथे (दि. 7 मे) रोजी घडली. रुबीना अहमद शेख (वय 65 वर्षे) या मुळानगर येथे नातवासह राहतात. (दि. 7 मे) रोजी पहाटे 1 वाजेच्या दरम्यान तीन चोरट्यांनी शेख यांच्या घराचा दरवाजा दगडाच्या सहाय्याने तोडून घरात प्रवेश केला.

रुबिना शेख यांना, ‘आरडा- ओरड केल्यास तुझ्यासह नातवाला कुर्‍हाडीने मारुन टाकु,’ असा दम दिला. घरातील सामानाची उचकापाचक करुन पैसे मागितले. या घटनेनंतर रूबिना शेख यांनी राहुरी पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. फिर्यादीवरून तीन आरोपींविरोधात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे करीत आहे.

दागिन्यांसह चोरट्यांनी बोकडसुद्धा चोरला..!

रूबिना शेख यांच्या गळ्यातील मनी, मुरणीसह सोन्याची कर्णफुले, कुडके असे सुमारे 7 ग्रॅम वजनाचे व 40 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने ओरबाडून पळ काढला. घरातून बाहेर जाताना 5 हजार रुपयांचा बोकड असा एकूण 40 हजार रुपयांचा मुद्देमाल लुटून चोरटे पसार झाले.

 

Back to top button