नगर : तरुणाला बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा | पुढारी

नगर : तरुणाला बेदम मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा

नगर : पुढारी वृत्तसेवा :  घराबाहेर आरडाओरडा चालू असल्याने तेथे पाहण्यासाठी गेलेल्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शुभम संतोष माळवे (रा.चोभे कॉलनी, गांधीनगर, बोल्हेगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सचिन वाघमारे, दीपक कांबळे, हर्षल उजागरे, कुणाल उजागरे व आकाश पाटोळे (सर्व रा.चोभे कॉलनी, गांधीनगर,बोल्हेगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शुभम माळवे गुरुवारी रात्री घरी जेवण करत असताना त्यांना गल्लीत आरडाओरडा सुरू असल्याचा आवाज आला.

त्यामुळे काय झाले ते पाहण्यासाठी म्हणून शुभम माळवे हे त्या ठिकाणी गेले असता, तू इथे का आला, तुझे इथे काय काम आहे, अशी आरोपींनी विचारणा केली. त्यानंतर हर्षल उजागरे आणि आकाश पाटोळे यांनी लाकडी दांडक्याने शुभम यांना मारहाण केली. सचिन वाघमारे, दीपक कांबळे, कुणाल उजागरे यांनी शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Back to top button