नगर: सव्वाआठ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त | पुढारी

नगर: सव्वाआठ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त

नगर: नगर-औरंगाबाद रस्त्यावर अवैध मद्य वाहतूक करणारा ट्रक राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पकडला. सुमारे आठ लाख 38 हजारांचा हा मद्यसाठा जप्त करून चालकाला अटक करण्यात आली. युवराज शिवाजी नाळे असे त्याचे नाव आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाला माहिती मिळाली की, एक सहाचाकी ट्रक अवैध मद्याचा साठा घेऊन जात आहे. त्यानुसार पथकाने सापळा लावला. गोवा राज्यात निर्मित व विक्रीकरिता असलेली व महाराष्ट्र राज्यात विक्रीस बंदी असलेला मद्यसाठा व तो घेऊन जाणारा सहाचाकी ट्रक जप्त करण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक ए. बी. बनकर, दुय्यम निरीक्षक डी. आर. ठोकळ, आर. पी. दांगट, एस. बी. विधाटे, सहायक दुय्यम निरीक्षक टी. बी. करंजुले, सहायक एन. एस. उके, डी. आर. कदरे, ए. के. सय्यद जवान, श्रीमती एस. आर. आठरे, ए. ए. कांबळे, नीलेश बुरा, डी. आर. बर्डे यांच्या पथकाने केली.

Back to top button