नेवासा : इलेक्ट्रिकल दुकान फोडून दीड लाखाचे साहित्य लंपास | पुढारी

नेवासा : इलेक्ट्रिकल दुकान फोडून दीड लाखाचे साहित्य लंपास

नेवासा; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील प्रवरासंगम येथील भरवस्तीत असलेल्या साईकृपा इलेक्ट्रिकल दुकानाच्या मागील बाजुचा पत्रा कापूस चोरट्यांनी एक लाख 60 हजारांच्या इलेक्स्ट्रिक साहित्यांची चोरी झाली. दुकान चालक विठ्ठल जगन्नाथ वने यांनी नेवासा पाोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विठ्ठल वने यांनी फिर्यादीत म्हटले, माझे प्रवरासंगम गावातील इलेक्ट्रिकल दुकान असून, दुकान रात्री बंद करून घरी गेलो होतो. सकाळी दुकान उघडण्यासाठी गेल्यावर कोणीतरी दुकानाचा मागील पत्रा कापून दुकानात प्रवेश करून चोरी केल्याचे निदर्शनास आले. मी दुकानात गेल्यावर सामान अस्ताव्यस पडलेले दिसले. दुकानाच्या मागील बाजुचा पत्रा कापलेला दिसल्याने दुकानातील सामानाची पाहणी केली असता तांब्याच्या तारांच्या रिळ, तसेच जुन्या जळालेल्या तांब्याच्या तारा, कॉपर वायर, सबमर्सिबल वायर, लहानमोठ्या तांब्याच्या तारांचे रीळ चोरीला गेल्याचे निदर्शनास आले.

Back to top button