चासजवळ दुभाजकास धडकून कंटेनर उलटला

चासजवळ दुभाजकास धडकून कंटेनर उलटला

वाळकी; पुढारी वृत्तसेवा : नगर-पुणे महामार्गावर चासजवळील महादेव मंदिरासमोर वळणावर भरधाव वेगातील कंटेनर रस्त्यावर उलटला. ही घटना शनिवारी (दि.22) पहाटे एकच्या सुमारास घडली. या अपघातात चालक सुदैवाने बचावला आहे. कंटेनर रस्त्यावरच आडवा झाल्याने बराच वेळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पुण्याहून नगरच्या दिशेने येत असलेल्या कंटेनरच्या चालकाचे नियंत्रण सुटले. कंटेनर दुभाजकावर आदळून रस्त्यावर उलटला.

यावेळी स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी कंटेनरच्या चालकाला बाहेर काढले. तसेच, नगर तालुका पोलिसांना संपर्क करून माहिती दिली. यावेळी रात्रीच्या गस्तीवर असलेले तालुका पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी गेले. तेथे क्रेन बोलावून रस्त्यावर आडवा झालेला कंटेनर बाजूला काढला व त्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news