नगर : कामाची आगाऊ रक्कम न दिल्याने मारहाण | पुढारी

नगर : कामाची आगाऊ रक्कम न दिल्याने मारहाण

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील सुभाषनगर येथे काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास लाकडी दांड्याने मारहाण करत दगडफेक झाल्याची घटना घडली. यात 3 जण जखमी झाले आहे. कामासाठी पाचशे रुपये अ‍ॅडव्हान्स दिले नाही म्हणून जमाव गोळा करून लाकडी दांड्याने मारहाण करत दकडफेक केल्याप्रकरणी 7 जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात काही काळ दंगल सदृश तणावाचे वातावरण पहावयास मिळाले. याबाबतची माहिती अशी की, शहरातील सुभाषनगर येथे काल रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास लाकडी दांड्याने मारहाण करत विटा फेकल्याची घटना घडली.

याबाबत शहर पोलीस ठाण्यात वसीम सय्यद बागवान यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, कामासाठी पाचशे रुपये अ‍ॅडव्हान्स दिले नाही म्हणून शाहरुख आकलीस शेख, सोहेल जावेद पठाण दोघे (रा. सुभाषनगर ता.कोपरगाव), राजु आरिफ शेख (रा. संजयनगर, कोपरगाव), गोलु ऊर्फ गगॅनदीप सिंग (रा. सुभाषनगर, कोपरगाव मुळ रा.अमृतसर राज्य पंजाब), विजय आरक, शुभम ऊर्फ लारा जाधव (दोघे रा.सुभाषनगर, कोपरगाव) व गोटया पुर्ण नाव माहीती नाही.

या आरोपींनी बेकायदेशीरपणे जमाव करुन फिर्यादीचे घरात घुसून फिर्यादीचे वडिल सय्यद बागवान यांना लाकडी दांड्याने व फिर्यादीचे भाऊ जावेद बागवान, मामाचा मुलगा अकबर फकिरा बागवान यांना त्यांचे हातातील विटा फेकुन मारुन जखमी करुन शिवीगाळ केली.
आरोपींनी विटा फेकुन मारल्याने इम्मतीयाज कोथमिरे यांचे घराच्या काचा फुटून नुकसान झाले असल्याच्या फिर्याद दिली आहे.
सदर घटनेचा पुढील तपास शहर पोलिस करीत आहे. या घटनेने मात्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Back to top button