धक्कादायक ! दीपाली सय्यद यांचे पाकिस्तान कनेक्शन ; माजी स्वीय सहायकाचे गंभीर आरोप | पुढारी

धक्कादायक ! दीपाली सय्यद यांचे पाकिस्तान कनेक्शन ; माजी स्वीय सहायकाचे गंभीर आरोप

नगर : पुढारी वृत्तसेवा : अभिनेत्री दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानशी संबंध असल्याचा खळबळजनक दावा करण्यात आला आहे. इतकेच नव्हे तर दीपाली सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व स्वीकारले आहे, असा गंभीर आरोप त्यांचे माजी स्वीय सहायक भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे. नगरमध्ये पत्रकार परिषदेत घेऊन त्यांनी हे आरोप केले आहेत. दीपाली सय्यद यांचे पाकिस्तानमध्ये बँक खाते असल्याचा दावा देखील भाऊसाहेब शिंदे यांनी केला आहे.

सोबतच सय्यद यांनी पाकिस्तानचे नागरिकत्व घेतल्याचा गंभीर आरोप शिंदे यांनी केला. त्यासाठी दाऊद इब्राहिम याची पत्नी मेहजबिन कासकर हिने मदत केली असून, सोफिया सय्यद या नावाने पाकिस्तानी नागरिकत्व दिले असल्याचे काही पुरावे भाऊसाहेब शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दाखविले. तसेच, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि रामदास आठवले हे नेते दिपाली सय्यद यांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याचा आरोप शिंदे यांनी केला. उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे अनेक वेळा लेखी तक्रार करून आणि पुरावे देऊनही दिपाली सय्यद यांच्यावर कारवाई होत नसल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.

Back to top button