पाथर्डी : मारहाण करून व्यावसायिकास लुटले | पुढारी

पाथर्डी : मारहाण करून व्यावसायिकास लुटले

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : छत्रपती संभाजीनगर येथील सुपारी व्यावसायिकाला अनोळखी चार इसमांनी मारहाण करून लुटण्याची घटना शनिवारी दुपारी घडली. प्रकाश शामसुंदर पंजवाणी हे व्यावसायिक त्यांच्या कामगाराला घेऊन मोटरसायकलवरून तिसगाव येथे सुपारीच्या व्यवसायाची चौकशीसाठी आले.

त्यावेळी एक अनोळखी तरुणास पंजवाणी यांनी मार्केट कुठे आहे, असे विचारणा केली. त्यावर तरुणाने मार्केट मागे आहे, माझ्या मुलीचा अपघात झाला आहे, मला तुम्ही मदत करा, अशी विनवणी केली. त्यावर पंजवाणी यांनी त्याला दुचाकीवर बसवून मांडवे शिवारात (ता.पाथर्डी) आणले. तेथे तीन अनोळखी व्यक्तींसह चौघांनी पंजवाणी व कामगारास मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देत खिशातील 45 हजार रुपये रोख, हातातील घड्याळ,,गळ्यातील एक तोळ्यांची सोन्याची चेन, हातातील अंगठी व मोबाईल हिसकावून घेतला. याप्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Back to top button