तांडा वस्त्या होणार प्रकाशमान : आमदार प्रा. राम शिंदे | पुढारी

तांडा वस्त्या होणार प्रकाशमान : आमदार प्रा. राम शिंदे

कर्जत : पुढारी वृत्तसेवा :  कर्जत-जामखेड मतदारसंघातील अंधारात असलेल्या तांडा वस्त्या प्रकाशमान होण्यासाठी आमदार प्रा. राम शिंदे यांनी वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेतून 1 कोटी रूपये निधी मंजूर करून आणला आहे. विमुक्त जाती, भटक्या जमातीच्या तांडा वस्त्या सुधारणेसाठी कर्जत-जामखेड मतदारसंघातील 25 कामांची जिल्हास्तरीय समितीने सरकारकडे शिफारस केली होती. आमदार शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे 25 कामांचा वसंतराव नाईक तांडा सुधार योजनेत समावेश होऊन 1 कोटी रूपये निधी मंजूर झाला. आमदार शिंदे यांनी मतदारसंघात 140 कोटींपेक्षा अधिक निधी आणला आहे.

तालुक्यातील बारडगाव सुद्रिक-खताळवस्ती 5 लाख, राक्षसवाडी बुद्रुक-श्रीरामवस्ती गावठाण 5 लाख, बारडगाव दगडी- बेलवंडी गावठाण 3 लाख, गणेशवाडी-पांडुळेवस्ती 2 लाख, दातीरवस्ती 2 लाख, माळेवाडी 2 लाख, चिलवडी-गाडेवस्ती 3 लाख, चांदेखुर्द-शिंगाडे, गावडेवस्ती 4 लाख, जामखेड तालुक्यातील कवडगाव-सांगळे गितेवस्ती 4 लाख, पिंपरखेड- कारंडेवस्ती 4 लाख, धानोरा गावठाण 2 लाख, धानोरा-फुंदे मिसाळ जायभायवस्ती 5 लाख, अरणगाव-धनगरवस्ती 7 लाख, अरणगाव-वंजारवस्ती 6 लाख, खर्डा-गितेवाडी 3 लाख, खर्डा-पांढरेवाडी 3 लाख, खर्डा-वडारवाडा 2 लाख, खर्डा-रजपूत भामटा वस्ती 6 लाख, खर्डा-दरडवाडी 5 लाख, मुंजेवाडी-जाधववस्ती 5 लाख, वाकी-कोळेकरवस्ती 4 लाख, कर्जत तालुक्यातील तळवाडी-श्रीरामवस्ती- अंतर्गत क्राँक्रिट रस्त्यासाठी 5 लाख, रूईगव्हाण-शिववस्ती रस्त्यासाठी 5 लाख, थेरगाव-सिद्धेश्वरवाडीच्या वीजपुरवठ्यासाठी 5 लाख रूपये मंजूर झाले आहेत. जामखेड तालुक्यातील धामणगाव- सोनारवाडा वस्ती रस्त्यासाठी 3 लाख रूपये मंजूर झाले आहेत.

पाठपुरावा केल्याने सरकारकडून निधी
मंत्री असताना अनेक वस्त्यांना मोठा निधी दिला. तांडा वस्त्यांचा अंधार दूर करण्यासाठीे पाठपुरावा केल्यानंतर सरकारने भरीव निधी मंजूर केला. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांचे आमदार शिंदे यांनी आभार मानले.

Back to top button