नगर : भरधाव वाहने चालविणार्‍यांवर कारवाई

नगर : भरधाव वाहने चालविणार्‍यांवर कारवाई
Published on
Updated on

वाळकी : पुढारी वृत्तसेवा : भरधाव वाहने चालवून व्यक्तिगत सुरक्षा, तसेच रस्त्याने जाणार्‍या-येणार्‍या लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल, असे कृत्य करणार्‍या सहा वाहन चालकांवर नगर तालुका पोलिसांच्या विविध पथकांनी सोमवारी (दि.27) कारवाई करत गुन्हे दाखल केले. सहाय्यक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जाणाया महामार्गांवर वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध पथके स्थापन करून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार नगर-कल्याण रस्त्यावर इम्रान नसिम सय्यद (रा.बारागाव नांदूर, ता.राहुरी), गोरख माणिक साठे (रा.भाळवणी, ता.पारनेर), नगर-जामखेड रस्त्यावर टाकळी काझी शिवारात भारत सारंगधर कराड (रा.खरवंडी कासार, ता.पाथर्डी), नगर-पाथर्डी रस्त्यावर मेहेकरी शिवारात नागेश गुलाब खर्से (रा.कौडगाव, ता.नगर), शरद प्रभाकर आव्हाड (रा.जांभळी, ता.पाथर्डी), सोमनाथ तुकाराम घुले (रा.बाळेवाडी, ता.नगर) यांच्यावर कारवाई करण्यात आली. या सर्वांविरुद्ध नगर तालुका पोलिस ठाण्यात मोटारवाहन कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news