नगर : पिकअपमधून 11 वासरांची सुटका; दोघेजण ताब्यात | पुढारी

नगर : पिकअपमधून 11 वासरांची सुटका; दोघेजण ताब्यात

नगर; पुढारी वृत्तसेवा : नगर-मनमाड रस्त्यावरील शिंगवे गावाजवळ जनावरांची (गोवंश) वाहतूक करणारा पिकअ‍ॅप एमआयडीसी पोलिसांनी शनिवारी (दि. 25) दुपारी पकडला. सुमारे 11 वासरांची सुटका केली. दोघांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. शाहरुख सुलतान कुरेशी (वय 25, रा. जामा मस्जीदजवळ, कुरेशीगल्ली, राहुरी) व अन्य एकाचा आरोपीमध्ये समावेश आहे. अधिक माहिती अशी, एमआयडीसीचे पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांना माहिती मिळाली, शिंगवे गावात बेकरीजवळ पिकअपमध्ये जनावरांची वाहतूक सुरू आहे.

त्यानुसार पोलिसांनी दुपारी शिंगवे गावात जावून छापा घातला असता पिकअपमध्ये 11 वासरे आढळून आली. पोलिसांनी वासरांची सुटका करून वरील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून सुमारे तीन लाख 30 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिकअपमधील सर्व जनावरे कत्तलीसाठी घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, पोलिस हेडकॉन्स्टेबल दत्तात्रय पवार, राहुल शिंदे, किशोर जाधव, संदीप खेंगट यांच्या पथकाने केली..

Back to top button