नगर : शस्त्रे बाळगणारे दोघे गजाआड; धारधार हत्यारे केली जप्त | पुढारी

नगर : शस्त्रे बाळगणारे दोघे गजाआड; धारधार हत्यारे केली जप्त

नगर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील काटवन खंडोबा कमानीजवळ टिळक रस्त्यालगत बेकायदेशीररित्या धारदार शस्त्र बाळगणार्‍या दोघांना कोतवाली पोलिसांनी काल रात्री बेड्या ठोकल्या. कुणालसिंग कमलसिंग जुन्नी (वय 19, रा. काटवनखंडोबा), अर्शद रशिद शेख (वय 22, रा. इमामवाडा, टिळकरोड, नगर) असे त्यांची नावे आहेत. काटवन खंडोबा कमानीजवळ कुणालसिंग कमलसिंग जुन्नी हा अवैध शस्त्रे विक्री करीत असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे निरीक्षक चंद्रशेखर यादव यांना बुधवारी रात्री मिळाली.

त्यानुसार कोतवाली पोलिसांनी सापळा लावून कुणालसिंग जुन्नी याला ताब्यात घेतले. त्याच्याजवळ दोन तलवारी, एक कोयता, एक सत्तूर अशी हत्यारे मिळून आली. ही हत्यारे कोठून आणली याबाबत विचारणा केली असता ती माझी आहेत. त्यातील कोयता व चाकू अर्शद शेख याचा असल्याचे सांगितले. पोलिसांनी त्याला टिळक रस्त्यावरून ताब्यात घेतले. या दोघांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात पोलिस नाईक सलीम शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव, सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र पिंगळे यांच्यासह पथकाने केली आहे.

Back to top button