पाथर्डी : कला शिक्षक संघाचा जुन्या पेन्शनला पाठिंबा | पुढारी

पाथर्डी : कला शिक्षक संघाचा जुन्या पेन्शनला पाठिंबा

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र कलाध्यापक संघ महामंडळाच्या पाथर्डी तालुका कलाध्यापक संघाने पाथर्डीचे नायब तहसीलदार भानुदास गुंजाळ यांना निवेदन देऊन जुन्या पेन्शन योजनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. 19 लाख सरकारी, निमसरकारी कर्मचारी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, या मागणीसाठी मंगळवारपासून (दि. 14 ) सुरू राज्यव्यापी बेमुदत संपाला पाठिंबा देत आहोत.

शिक्षक भारती सरकारी निमसरकारी कर्मचारी-शिक्षक संघटना समन्वय समितीचा भाग आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांना जुनी पेन्शन योजना लागू करा, अशी समन्वय समितीच्या बैठकीत मागणी करण्यात आली. कलाध्यापक संघाचे अध्यक्ष अविनाश नेहुल, उपाध्यक्ष विद्या गोवरे, सचिव लक्ष्मण देशमुख, राजेंद्र मतकर, सुरेश मिसाळ, दिगंबर ढाकणे, संजय ससाणे, एम. आर. दातीर, बि के वाघमारे, एस एम शेख, गणेश सरोदे, संजय गटागट, ए बी लाड, डी टी राठोड, मिलिंद गायकवाड, एम डी दहिफळे आदी शिक्षक बांधवांनी दिलेल्या निवेदनावर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

Back to top button