नगर : गावठी पिस्तुल बाळगणारा गजाआड | पुढारी

नगर : गावठी पिस्तुल बाळगणारा गजाआड

नगर : पुढारी वृत्तसेवा :  शहरातील बाजार समितीतील शौचालयजवळ गांजा पित बसलेल्या एका तरुणांकडून कोतवाली पोलिसांनी गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुस जप्त केले. ही कारवाई सोमवारी(दि. 6) केली. जॉन कासिनो परेरा (वय 34, रा. चंदे बेकरीजवळ, बंगाल चौकी, नगर) असे आरोपीचे नाव आहे. कोतवाली पोलिसांना माहिती मिळाली की, बाजार समितीतील शौचालयाजवळ कोणीतरी शस्त्र घेऊन गांजा पित बसले आहे. त्यानुसार कोतवाली पोलिसांनी सापळा लावून वरील व्यक्तीला ताब्यात घेत त्यांची अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ एक गावठी पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली.

याबाबत पोलिस कॉन्स्टेबल कैलास शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस निरीक्षक चंदशेखर यादव यांच्या पथकातील पोलिस उपनिरीक्षक मनोज कचरे, पोलिस कॉन्स्टेबल गणेश धोत्रे, पोलिस नाईक योगेश भिंगारदिवे, पोलिस नाईक रियाज इनामदार, पोलिस नाईक योगेश खामकर, पोलिस कॉन्स्टेबल सुजय हिवाळे, संदीप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, अमोल गाढे, सागर मिसाळ यांच्या पथकाने केली.

Back to top button