नगर : नेवासा तालुक्यामध्ये बेकायदा गुटखा विक्री

नगर : नेवासा तालुक्यामध्ये बेकायदा गुटखा विक्री

Published on

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  नेवासा शहरासह तालुक्यात सर्रासपणे बेकायदा गुटखा विक्री जोरात चालू आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाचे या गुटखा विक्रीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे गुटखा विक्रेत्यांचे धाडस वाढत आहे. खुलेआम गुटखा विक्रीने तरुण वर्ग नशेच्या आहारी जात आहे. शासनाकडून गुटखा विक्रीवर बंदी घातलेली असताना नेवासा शहरात, परिसरात व तालुक्यात बिनदिक्कतपणे गुटखा पुड्यांची सर्रासपणे विक्री होत आहे.

तालुक्यातील ग्रामीण भागातील लहान टपर्‍या व किराणा दुकानांवर खुलेआम वेगवेळ्या कंपनीच्या गुटखा पुड्या मिळतात. नेवाशात कुठेही गुटखा सहज उपलब्ध होत आहे. चढ्या भावाने या पुड्यांची विक्री होते. शाळांच्या अवतीभोवतीही विक्री होत आहे. मावाविक्रीही सर्रास होत आहे. बेकायदा गुटखा विक्रीला पायबंद घालावा व दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news