नगर : बजरंग दलाच्या संयोजकावर प्राणघातक हल्ला

नगर : बजरंग दलाच्या संयोजकावर प्राणघातक हल्ला
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : बजरंग दलाचे शहर संयोजक कुणाल सुनील भंडारी (रा.आनंदनगर, स्टेशन रोड) यांच्यावर टोळक्याने हल्ला चढवित चॉपर पोटात खुपसून जखमी केले. शहरातील रामवाडी येथील पेट्रोल पंपाशेजारील चौकात सोमवारी (दि.27) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. भंडारी यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबावरून 34 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नासीर शेख, अल्तमश शेख, सादिक शेख मौलाना, सलमान हिनु शेख, सलमान अस्लम शेख, जाकीर तांबोळी, अश्पाक शेख, अफजल शेख, शहेबान जहागीरदार व इतर 20 ते 25 अशा 34 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हल्ल्यात भंडारी जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कुणाल भंडारी व बंटी ढापसे असे दोघे दुचाकीवरून जात असताना रामवाडी परिसरातील पेट्रोल पंपाजवळ गर्दी पाहून थांबले होते. त्याठिकाणी आलेल्या जमावाने भंडारी यांच्यावर हल्ला चढवित जीवे मारण्याचा प्रयत्न केला. अल्तमश शेख याने हातातील दांडक्याने मारहाण केली. नासीर शेख याने चॉपर पोटात खुपसत जखमी केले. तसेच नासीर शेख सोबत असलेल्या इतर इसमांनी लोखंडी रॉडने, लाकडी दांडक्याने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे भंडारी यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, चार जणांना अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भान्सी करीत आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news