पाथर्डीत आज 21 कोटींच्या विकासकामांना प्रारंभ | पुढारी

पाथर्डीत आज 21 कोटींच्या विकासकामांना प्रारंभ

पाथर्डी तालुका; पुढारी वृत्तसेवा : पुरवणी अर्थसंकल्पंतर्गत 14 कोटी व जलजीवन मिशन योजनेंतर्गत 7 कोटी 13 लाख. तर आमदार मोनिका राजळे यांच्या स्थानिक विकास निधींतर्गत 60 लाख अशा 21 कोटी 73 लाख रुपये खर्चाच्या विकासकामांचे भूमिपूजन आज (रविवारी) आमदार मोनिका राजळे यांच्या हस्ते होत आहे.

खासदार सुजय विखे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या कार्यक्रमास भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, महिला तालुकाध्यक्ष काशिताई गोल्हार, माजी जि. प. सदस्य राहुल राजळे, ललिता शिरसाट, संध्या आठरे, माजी सभापती सुनीता दौड, उपसभापती मनीषा वायकर, भाजप शहराध्यक्ष अजय भंडारी, ज्योती मंत्री, चंद्रकला खेडकर,विष्णूपंत अकोलकर, सुनील ओहोळ, सुभाष केकाण, गंगूवाई आटकर, माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे, अभव आव्हाड, नंदकुमार शेळके आदी उपस्थित राहणार आहेत.

Back to top button