वाळकी : हॉटेलमधील वेश्या व्यवसायावर छापा | पुढारी

वाळकी : हॉटेलमधील वेश्या व्यवसायावर छापा

वाळकी : नगर-सोलापूर रस्त्यावरील वाकोडी फाट्याजवळ असलेल्या हॉटेल सनराईजमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर भिंगार कॅम्प पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. एका 19 वर्षीय बांग्लादेशातील तरुणीची सुटका केली. याप्रकरणी हॉटेलचालक मयूर जगताप, संतोष सत्यभान काळेसह तिघांवर गुन्हा दाखल केला. याबाबत पुणे येथील सामाजिक संस्थेचे प्रतिनिधी संदेश किसन जोगेराव यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुण्यात सामाजिक संस्था चालविणार्‍या जोगेराव यांच्या संस्थेला नगरमधील वाकोडी फाट्याजवळ काही परप्रांतीय व परदेशीय मुलींना वेश्या व्यवसायासाठी प्रवृत्त केले जात असल्याची माहिती मिळाली होती. ही माहिती जोगेराव यांनी नगरमध्ये येत भिंगार पोलिसांना दिली. या माहितीवरुन भिंगार कॅम्पचे सहायक पोलिस निरीक्षक. शिशीरकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखालील पथकाने गुरुवारी (दि.23) सायंकाळी हॉटेल सनराईजवर छापा टाकला. तेथे आढळलेल्या युवतीची सुटका करण्यात आली.

Back to top button