नगर : ट्रकच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

नगर : ट्रकच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

Published on

नेवासा : पुढारी वृत्तसेवा :  नगर-औरंगाबाद महामार्गावरील नेवासा फाटा येथील आंबेडकर चौकात एका 57 वर्षीय पादचार्‍यास ट्रकने जोराची धडक दिली. गंभीर जखमीचा उपचार घेत असताना मृत्यू झाला. काल सायंकाळी साडेपाच वाजता ही घटना घडली. नारायण रेवजी गवारे (वय 57, रा.शिरसगांव, ता.नेवासा) खासगी कामानिमित्त नेवासा येथे आलेले होते.

ते नेवासा फाटा येथे बसमधून उतरून रस्ता ओलंडत असताना समोरून येणार्‍या ट्रकने (क्रमांक एम.एच 21 एक्स 9977) त्यांना जोरदार धडक दिली. त्यात गवारे गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ नेवासा फाटा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असता, उपचार सुरू असताना रात्री आठ वाजता त्यांचा मृत्यू झाला. याबाबत अर्जुन नारायण गवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news