कुकाणा : ट्रकची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू | पुढारी

कुकाणा : ट्रकची दुचाकीला धडक, महिलेचा मृत्यू

कुकाणा; पुढारी वृत्तसेवा : नेवासा फाट्याजवळ झालेल्या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. तालुक्यातील नेवासा फाटा ते भानसहिवरा रस्त्यावर उसाने भरलेल्या भरधाव ट्रकने मोटारसायकलला पाठीमागुन जोराची धडक दिली. त्यात देडगाव येथील महिला जागीच ठार झाली. ही घटना सोमवारी (दि.6)दुपारी घडली.

मोटारसायकलवरून मुंगसे दाम्पत्य नेवासा फाट्यावरून काम आटोपून देडगाव येथील घरी जात होते. नेवासा फाटा ते भानसहिवरा रस्त्यावर हंडिनिमगाव शिवारात त्यांच्या मोटारसायकलला भरधाव ऊसाच्या ट्रकने मागून जोराची धडक दिली. या अपघातात लंकाबाई मुंगसे यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सखाहारी पांडुरंग मुंगसे यांनी नेवासा पोलिस ठाण्यात ट्रकचालकाविरूद्ध फिर्याद दाखल केली.

Back to top button