श्रीरामपूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकजण ताब्यात | पुढारी

श्रीरामपूर : अल्पवयीन मुलीचा विनयभंग; एकजण ताब्यात

श्रीरामपूर; पुढारी वृत्तसेवा : शहरातील खासगी क्लासला जाणार्‍या अल्पवयीन मुलीचा वेळोवेळी पाठलाग केला. तिला मोटारसायकलवर बसवुन रेल्वेब्रीज परीसरात काटेरी वनात नेवुन विनयभंग केल्याप्रकरणी प्रमोद अरुण शिंदेसह दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. प्रमोद शिंदे ( वय 20 वर्षे , रा . कांदा मार्केटमागे) याने तिचा विनयभंग केला. तिचे सोबत फोटो काढले. मारहाण केली. यानंतर वेळोवेळी फोटो व्हायरल करण्यासह आत्महत्या करण्याची धमकी देत विनयभंग केल्याप्रकरणी अल्पवयीन मुलीने शहर पोलिसात फिर्याद दिली.

बालकांचे लैगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 8,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. शिंदे गुन्हा दाखल झाल्यापासुन पसार होता. पो. नि. हर्षवर्धन गवळी यांनी त्याचा शोध घेण्याचे तपास पथकास आदेश दिले. गोपनीय बातमीदारामार्फत शोध घेतला असता, शिंदे श्रीरामपुरात येणार असल्याची माहिती मिळाली. यानुसार सापळा रचुन शिताफिने शिंदे यास पथकाने ताब्यात घेतले. त्यास न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडी मंजुर केली आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पो. अधीक्षक, स्वाती भोर, उपविभागीय पो. अधिकारी संदिप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पो. निरीक्षक हर्षवर्धन गवळी, सपोनि जीवन बोरसे, पोसई समाधान सुरवाडे, पोना रघुवीर कारखेले, पो. काँ. गौतम लगड, पो. काँ. राहुल नरवडे , रमिझराजा अत्तार, गणेश गावडे, मच्छिंद्र कातखडे , गौरव दुर्गुळे, लक्ष्मण सांगळे तसेच अप्पर पो. अधीक्षक कार्यालयाचे पो.ना. फुरकान शेख व पो.काँ. प्रमोद जाधव यांनी यशस्वी केली. तपास पोसई समाधान सुरवाडे करीत आहेत.

Back to top button