नगर : अमरधामातील मूलभूत प्रश्न मार्गी लावू : आमदार संग्राम जगताप | पुढारी

नगर : अमरधामातील मूलभूत प्रश्न मार्गी लावू : आमदार संग्राम जगताप

नगर;  पुढारी वृत्तसेवा : नालेगाव अमरधाममधील विविध प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी नियोजन केले आहे. त्यानुसार लोकसहभागातून विद्युत दाहिनीचे काम पूर्ण केले आहे. तिथे दर्जेदार पद्धतीची स्टाईल बसविण्यात आली आहे. आता अंत्यविधीसाठी जाळ्या बसवण्याचे काम सुरू आहे. अमरधाममधील कामे टप्प्याटप्पयाने पूर्ण करण्यात येतील, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

नालेगाव अमरधाममधील विविध विकास कामांची पाहणी आमदार संग्राम जगताप यांनी केली. यावेळी उपमहापौर गणेश भोसले, शहर अभियंता श्रीकांत निंबाळकर, माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल, सामाजिक कार्यकर्ते अजय चितळे, वैभव ढाकणे, वीरेंद्रसागर गुंजाळ, कुलदीप भिंगारदिवे, ऋषिकेश ताठे, गणेश गोरे, सत्यजित ढवण, अंकुश मोहिते, जितेंद्र बनकर आदीउपस्थित होते.

जगताप म्हणाले, अमरधाममध्ये अंत्यविधी व दशक्रिया विधी नागरिक मोठ्या संख्येने येतात. त्यांना बसण्यासाठी चांगली व्यवस्था करण्यात येणार आहे. याचबरोबर अमरधाम बाहेर वाहतुकीची समस्या वारंवार मोठ्या प्रमाणात निर्माण होत असते. त्यासाठी अमरधाममधील मोकळ्या जागेत पार्किंगची अवस्था करण्यात येणार आहे. याच परिसरामध्ये काँक्रिट करण्याचे कामही सुरू केले जाणार आहे.

Back to top button