शहरटाकळीत दारू अड्ड्यांवर छापे; पाच लाख रुपयांच्या गावठी दारूसह रसायन नष्ट | पुढारी

शहरटाकळीत दारू अड्ड्यांवर छापे; पाच लाख रुपयांच्या गावठी दारूसह रसायन नष्ट

शेवगाव तालुका; पुढारी वृत्तसेवा : शहरटाकळी भागात हातभट्टीवर छापे टाकून सव्वापाच लाख रुपयांचे दारू व रसायन नष्ट करत पोलिसांनी आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. शुक्रवार (दि.3) पहाटे ही कारवाई करण्यात आली. संभाजी नारायण शिंदे याची 6 हजाराची तयार दारू, 48 हजार रूपयांचे कच्चे रसायन, रोहिदास दगडू शिंदेची 12 हजाराची दारु व 80 हजारांचे कच्चे रसायन, बाळासाहेब लक्ष्मण शिंदेची 4 हजार 500 रूपयांची दारु व 65 हजाराचे कच्चे रसायन, तुकाराम सुखदेव शिंदेची 6 हजाराची दारू 48 हजारांचे कच्चे रसायन, राजू किसन शिंदेची 4 हजार 500 रुपयांची दारू व 48 हजाराचे कच्चे रसायन, अर्जुन लक्ष्मण शिंदेची 12 हजार रूपयांची दारू व 80 हजाराचे कच्चे रसायन, अनिल लक्ष्मण शिंदेची 7 हजार 500 रुपयांची दारू व 56 हजाराचे कच्चे रसायन, सिंधू दावीद कोल्हेची हातभट्टी पोलिसांनी नष्ट केली.

Back to top button