चांदा-कुकाणा मार्गातील हॉटेलवर पोलिसांचा छापा | पुढारी

चांदा-कुकाणा मार्गातील हॉटेलवर पोलिसांचा छापा

सोनई; पुढारी वृत्त्तसेवा : चांदा-कुकाणा रस्त्यावरील हॉटेल सह्याद्री येथे छापा टाकून पोलिसांनी देशी विदेशी कंपनीच्या 315 दारूच्या बाटल्या व रोख रक्कमेसह एकूण 63 हजार रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे. याबाबतची माहिती अशी की, सोनई पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांना गुप्त माहिती मिळाली की, चांदा येथील हॉटेल सह्याद्री येथे बनावट दारू विक्री होत आहे. यावरून पथकाने छापा टाकला असता 53 हजार 343 रुपये किमतीचे देशी व विदेशी कंपनीचे एकूण 315 दारूच्या बाटल्या व 12 हजार 960 रुपये रोख असा एकूण 63 हजार 303 रुपयांचा मुद्देमाल पकडला आहे.

सोनई पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल सचिन ठोंबरे यांचे फिर्यादीवरून रामेश्वर भाऊसाहेब शेलार व शैलेश श्रीधर दहातोंडे रा. चांदा या दोघांवर महाराष्ट्र दारू कायदा कलम 65(ई)83 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक माणिक चौधरी यांचे मार्गदर्शनाखाली आर.आर लबडे पुढील तपास करत आहे.

Back to top button