नगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

नगर : अल्पवयीन मुलीवर अत्याचार; श्रीगोंदा पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

श्रीगोंदा : पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीस जीवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे. आरोपीविरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलिसांकडून गुन्ह्याबाबत माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात आली. पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरोधात अत्याचार, पोस्को व माहिती तंत्रज्ञान कायदा सन 2000 चे कलम 67 नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी फरार झाला आहे.

ही घटना सन 2022 मधील ऑक्टोबर महिन्यात घडली, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या बाबत काही कार्यकर्त्यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांची भेट घेऊन माहिती दिली. त्यानंतर त्यांनी कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस निरीक्षक रामराव ढिकले यांना दिल्या. त्यानंतर रात्रीत सूत्रे फिरली. पोलिस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव म्हणाले, आरोपीविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.

Back to top button