नगर : ‘महानंद’च्या अध्यक्षपदी राजेश परजणे ; बिनविरोध निवडीबद्दल मंत्री राधाकृष्ण विखेंकडून सत्कार | पुढारी

नगर : ‘महानंद’च्या अध्यक्षपदी राजेश परजणे ; बिनविरोध निवडीबद्दल मंत्री राधाकृष्ण विखेंकडून सत्कार

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा :  महाराष्ट्र राज्यातील सहकारी दूध संघांची शिखर संस्था अशी ओळख असलेल्या मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या (महानंद) अध्यक्षपदी गोदावरी खोरे नामदेवराव परजणे तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांची बिनविरोध वर्णी लागली आहे.  दरम्यान, या निवडीनंतर महसूल, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी सत्कार करुन त्यांना शुभेच्छा दिल्या. मुंबईतील गोरेगाव येथे महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या कार्यस्थळावर अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडली.

अध्यक्षपदासाठी परजणे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षपदाचे सूचक म्हणून संचालक विनायकराव पाटील तर अनुमोदक संचालक वैभव पिचड यांनी ठराव मांडले.  21 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 16 संचालक आधीच बिनविरोध निवडले होते. यात उर्वरीत महाराष्ट्र विभागातून परजणे बिनविरोध निवडून आले. महासंघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकर्‍यांसाठी विविध योजना परजणे यांच्या गोदावरी दूध संघाने कार्यक्षेत्रामध्ये राबविल्या. भारतीय राष्ट्रीय सहकारी डेअरी फेडरेशन (आनंद) गुजरात तसेच कॅनरा बँकेचे संचालकपदाचे कामकाज परजणे यांनी पाहिले आहे.

अनेक सहकारी, शासकीय, धार्मिक, निमशासकीय संस्थांबरोबरच शिक्षण संस्थांवर ते सद्या कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघाच्या अध्यक्षपदी निवडीबद्दल परजणे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शालिनीताई विखे, खा. डॉ. सुजय विखे , महासंघाचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी अभिनंदन केले.

Back to top button