नगर: राजूर “पोलिस दादा “च्या आशिर्वादाने पोलिसांच्या नाकावर टिचुन दारु विक्री सुरूचं…..!

नगर: राजूर “पोलिस दादा “च्या आशिर्वादाने पोलिसांच्या नाकावर टिचुन दारु विक्री सुरूचं…..!
Published on: 
Updated on: 

अकोले, पुढारी वृत्तसेवा: दारुबंदी असलेल्या राजूर गावात दारु विक्री होत असुन पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष या मथाळ्याखाली दैनिक पुढारीत वृत्त प्रसिद्ध होताच राजूर पोलिसांनी मोजक्या अवैध दारु विक्रेत्यांवर जुजबी कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये चार दारुविक्रेते आणि एका मटका मालकावर कारवाई करत सुमारे ८ हजार ६८० रुपायाची अवैध दारु जप्त केली आहे. मात्र, राजूरसह परिसरात काही " पोलिस दादा " च्या आशिर्वादाने चड्या भावाने पोलिसांच्या नाकावर टिचुन दारु विक्री सुरू आहे.

राजूर येथील अवैध दारु विक्री बंद करण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने पुढाकार घेत राजूर पोलिस स्टेशनला पत्रव्यवहार केला होता. अकोले तालुका दारुबंदी चळवळीचे हेरंब कुलकर्णी यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची समक्ष भेट घेत निवेदन दिले होते. तसेच पोलिस प्रशासनाकडून राजूर गावातील अवैध दारु धंदे बंद करावी, अन्यथा अकोले तालुका दारुबंदी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आंदोलनाचा इशारा पोलिस प्रशासनाला देण्यात आला होता. तर दारुबंदी असलेल्या " राजूर गावात दारु विक्री होत असुन पोलिसांचे अक्षम्य दुर्लक्ष " या मथाळ्याखाली दैनिक पुढारीत वृत्त प्रसिद्ध होताच या वृत्ताची दखल घेत काही लोकांवर कारवाई करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोले तालुक्यातील राजूर गावात दारू बंदी आहे. परंतु अवैध दारू विक्री थांबत नसल्याने जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी राजूरला भेट देण्याची विनंती केली आहे. तसेचं दारू विक्रेत्यांवर झालेल्या केसेस एकत्र करून तडीपार प्रस्ताव करावेत. राजूरमध्ये अनेक पोलीस दारूविक्रेत्यांना सामील असल्याने ज्यांच्या बिट मध्ये दारूविक्री होते. त्यांना निलंबित करावे. तसेच अनेक वर्षांपासून एकाच ठिकाणी अनेक वर्षे असलेल्या पोलिसाचे अवैध दारुविक्रेत्या समवेत घनिष्ठ संबध तयार झाले असल्याने त्यांच्या बदल्या करणे गरजेचे आहे. राजूरमध्ये अवैध दारुला नवीन पोलीस अधिकाऱ्यांकडून लगाम बसेल असे वाटले होते, परंतु तसे काही झाले नाही.

– हेरंब कुलकर्णी, प्रनेते, दारुबंदी चळवळ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news