नगर : महिलेकडे खंडणी मागणार्‍यांविरोधात गुन्हा | पुढारी

नगर : महिलेकडे खंडणी मागणार्‍यांविरोधात गुन्हा

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : येथील महिलेस, ‘तुमच्याबद्दल माझ्याकडे अनेक तक्रारी आहेत. तुमचे अश्लील व्हिडिओ देखील आहेत. तुम्ही मला 6 लाख रुपये न दिल्यास तुमच्यावर गुन्हा दाखल करील, तुमचे अश्लील व्हिडिओ प्रसारित करेल,’ अशी धमकी दिल्या प्रकरणी शौकत शेख याच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील एका चौकात राहणार्‍या महिलेची शौकत पठाण या तरुणाची ओळख होती. दरम्यान, शौकत याने, ‘माझ्याकडे तुमच्या विरोधात तक्रारी आल्या आहेत.

तुम्ही लोकांना त्रास देता, याचे पुरावे म्हणून माझ्याकडे व्हिडीओ शुटींग, रेकॉर्डींग तसेच तुमचे अश्लील फोटो आहेत. याबदल्यात मला 6 लाख रूपये द्या. नाहीतर मी पोलिस स्टेशनमध्ये तुमची तक्रार करील,’ असे धमकावित पठाण याने महिलेकडे पैशांची मागणी केली. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादी वरून संगमनेर शहर पोलिसात शौकत पठाण याच्याविरूद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलिस करीत असल्याचे सांगण्यात आले.

Back to top button