पारेगावातील चोरट्याकडून सहा दुचाकी जप्त; 3 मोबाईलसह 2. 90 लाखांचा मुद्देमाल हस्तगत | पुढारी

पारेगावातील चोरट्याकडून सहा दुचाकी जप्त; 3 मोबाईलसह 2. 90 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

संगमनेर; पुढारी वृत्तसेवा : संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधून मोटारसायकलची चोरी करणार्‍या पारेगाव बुद्रुक येथील लक्ष्मण जयराम गोर्डे यास पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 6 मोटार सायकलसह 3 मोबाईल असा एकुण 1 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधून अनेकांच्या मोटारसायकल चोरीस गेल्या होत्या. संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचा पदभार पो. नि. अरुण आव्हाड यांनी हाती घेताच पहिलीच धडक कारवाई केली आहे.

पारेगाव बुद्रुक येथे एकजन चोरीच्या दुचाकी आणून विकत असल्याचे खबर्‍यामार्फत पो. हे. काँ. अनिल जाधव यांना समजले. त्यांनी पो. नि. आव्हाड यांना ही माहिती सांगितल्याने स.पो.नि. सुजित ठाकरे, पो.हे.काँ. डमाळे पो.ना.अनिल जाधव, पाटील व शेंगाळ यांच्या पथकाने चोरटा ताब्यात घेतला.

Back to top button