नगर : सहाय्यक आयुक्तांना घातला 80 हजारांचा गंडा | पुढारी

नगर : सहाय्यक आयुक्तांना घातला 80 हजारांचा गंडा

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरातील गोल्डनसिटी येथील पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त जालिंदर थिटमे यांची 80 हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक झाली असल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी मुंबई येथील एकाच्याविरोधात संगमनेर शहर पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, गोल्डनसिटी येथील पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त जालिंदर काशिनाथ थिटमे यांना राहुलकुमार (एसबीआय, मीरारोड,मुंबई) याने संपर्क करुन विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांच्या मोबाइलवर अ‍ॅप डाऊन लोड करण्यास सांगून थिटमे यांना आलेला कोड शेअर करण्यास सांगून त्यांची 80 हजार रुपयांना लुबाडले. याप्रकरणी जालिंदर थिटमे यांनी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन संगमनेर शहर पोलिसांनी राहुल कुमार याच्याविरुद्ध फसवणुकीचा दाखल केला आहे. याबाबतचा अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक निकिता महाले या करत आहेत.

Back to top button