राहुरी : तलवार घेऊन फिरणार्‍या दोघांना पोलिसांनी पकडले | पुढारी

राहुरी : तलवार घेऊन फिरणार्‍या दोघांना पोलिसांनी पकडले

राहुरी; पुढारी वृत्तसेवा : रात्रीच्या दरम्यान हातात तलवार घेऊन फिरणार्‍या दोघां जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व राहुरी पोलिस पथकाने राहुरी तालूक्यातील कोल्हार खुर्द येथे पकडले. त्यांच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे. राहुरी पोलिस ठाणे हद्दीत अवैध व्यवसायवांवर कारवाई करण्यासाठी नगर येथील गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक राहुरी पोलिसांसमवेत गस्त घालीत होते.

यावेळी दोघेजण (कोल्हार खुर्द, ता. राहुरी) गावातील खंडोबा मंदीर राजवाड्याचे पाठीमागे सार्वजणीक जागेत बेकायदेशीर तलवार घेऊन संशयीतरित्या फिरत असल्याची माहिती मिळताच त्यांनी पोलिसांनी तत्काळ या ठिकाणी धाव घेतली. यावेळी पोलिसांना दोघांपैकी एकाजवळ तलवार असल्याचे दिसले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले.

अजय प्रभाकर पेटारे (वय 28), संकेत दीपक कापसे (वय 25 दोघे राहणार कोल्हार बु. ता. राहाता) असे या दोघांची नावे आहेत. हवालदार रणजीत जाधव यांच्या फिर्यादीवरून आरोपी अजय पेटारे व संकेत कापसे या दोघांवर आर्मक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

Back to top button