नगर : पुढारी वृत्तसेवा : पर्यावरण रक्षणासाठी सर्वांनी पुढे येऊन प्लॉस्टिक मुक्तीचा संकल्प करावा. आपल्या दैनंदिन कामकाजासाठी कापडी पिशवीचा वापर करावा. सभापती कुमार वाकळे यांच्या माध्यमातून प्रभाग सातमधील प्रभागातील नागरिकांना कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले.बोल्हेगाव येथे मनपा स्थायी समिती सभापती कुमारसिंह वाकळे यांच्या प्रयत्नातून कै. विशालभाऊ वाकळे उद्यानाचे लोकार्पण आमदार संग्राम जगापत यांच्या हस्ते झाले.
यावेळी उपमहापौर गणेश भोसले, विरोधी पक्षनेता संपत बारस्कर, नगरसेवक मनोज कोतकर, नगरसेवक अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, माजी नगरसेवक निखिल वारे, माजी नगरसेवक बाळासाहेब पवार, संभाजी पवार, दादा दरेकर आदी उपस्थित होते.
सभापती कुमार वाकळे म्हणाले, आ. संग्राम जगताप यांच्यामुळे प्रभागामधील विकासकामांबरोबरच धार्मिक व सामाजिक कार्याला प्राधान्यक्रम देत विकासाची वाटचाल सुरू आहे.