अल्पवयीन मुलींना श्रीरामपुरातून पळविले | पुढारी

अल्पवयीन मुलींना श्रीरामपुरातून पळविले

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा श्रीरामपूर शहरातून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलेली आहे. पहिली अल्पवयीन मुलगी ही वार्ड नं.2, गुलशन चौक परिसरात राहणारी आहे. दि.13 डिसेंबर रोजी 12 च्या सुमारास सदर मुलगी शाळेतून घरी आली नाही, म्हणून तिची चौकशी केली असता तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे समजल्यानंतर मुलीच्या वडिलांनी फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरी घटना श्रीरामपूर शहरातील सुतगिरणीरोड परिसरात घडली आहे. यातील 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून दि.11 डिसेंबर रोजी पहाटे 2 ते 5 च्या सुमारास राहत्या घरातून आरोपी चेतन भाऊलाल कासवत (वय-19, रा.निलकंठ गार्डन बिल्डिंगसमोर, पुर्णवादनगर, वार्ड नं.7, श्रीरामपूर) याने पळवून नेल्याचे सदर अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपी चेतन भाऊलाल कासवत याच्याविरोधात श्रीरामपूर पोलिसात भादंवि कलम 366, 366 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून श्रीरामपूर परिसरातून अल्पवयिन मुलींना फूस लावून पळविण्याचे प्रकार वाढलेले आहेत.

Back to top button