नगर : फरार आरोपी बंटी राऊत जेरबंद | पुढारी

नगर : फरार आरोपी बंटी राऊत जेरबंद

नगर : पुढारी वृत्तसेवा : अनेक गुन्ह्यांत फरार असलेला आरोपी भावेश उर्फ बंटी अशोक राऊत (रा.माणिक चौक, नगर) याला कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. आरोपी हा एका फ्लॅटमध्ये लपून असल्याची माहिती पोलसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शोध पथकाने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी बंटी राऊत याने 2 जानेवारी 2022 ला रोहित प्रवीण चंगेडिया (रा. बुरूडगाव रोड) यांना तू प्रिन्स हॉटेल येथे भांडण का केले, असे म्हणत चंगेडीया यांच्या गाडीला लाथ मारली होती. त्यानंतर चंगेडिया खाली पडल्यावर आरोपीने लोखंडी रॉडने डोक्यात मारहाण केली होती.

याबाबत कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिस निरीक्षक संपत शिंदे यांना माहिती मिळाली होती की, आरोपी बंटी राऊत हा तपोवन रोडवरील एका प्लॅटमध्ये लपून बसलेला आहे. त्यानुसार पथकाने सापळा लावून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीविरोधात कोतवाली व तोफखाना पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे 19 गुन्हे दाखल आहेत. सहायक पोलिस निरीक्षक विवेक पवार, पोलिस उपनिरक्षक मनोज कचरे, हेड कॉन्स्टेबल सतिष भांड, गणेश धोत्रे, योगेश भिंगारदिवे, रियाज इनामदार, इसराईल पठाण, सुजय हिवाळे, सोमनाथ राऊत, संदीप थोरात, अमोल गाढे यांनी ही कारवाई केली.

Back to top button