राहुरी सेंट्रल बँकेचा कारभार चव्हाट्यावर

राहुरी सेंट्रल बँकेचा कारभार चव्हाट्यावर
Published on
Updated on

राहुरी : पुढारी वृत्तसेवा :  राहुरी शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या सेंट्रल बँकेतील अधिकारी व कर्मचार्‍यांच्या दुर्लक्षित कारभारामुळे ग्राहकांची चांगलीच अडचण होत असल्याचे चित्र आहे. उर्मटपणाने बोलून ग्राहकांचा अपमान करणार्‍या संबंधित अधिकारी व कर्मचार्‍यांना वठणीवर आणण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे. राहुरी शहरातील सेंट्रल बँकेची शाखा अत्यंत छोट्याश्या जागेत दुसर्‍या मजल्यावर आहे.

जुने बांधकाम असलेल्या इमारतीमध्ये दुसर्‍या मजल्यावर जाताना लहान मुले, वयोवृद्ध व्यक्तींना मोठी अडचण होते. त्यातच बँकेमध्ये कोठेही ग्राहकांना बसण्यासाठी व्यवस्था नाही. अनेकदा बँकेमध्ये ग्राहक आल्यानंतर त्यांना उभे राहण्यासाठी जागा नसल्याने वयोवृद्ध, महिला यांना बँकेच्या बाहेर थांबावे लागते. किंवा बँकेच्या आवारात रस्त्यावर उभे राहावे लागते.

दुपारच्या वेळी अधिकारी व कर्मचारी हे बँकेचे दार लावून घेतात. ग्राहकांना बाहेर थांबण्यास सांगतात. बँक दुसर्‍या मजल्यावर असल्याने तेथे बसण्याची व्यवस्था नाही. त्यामुळे रस्त्यावर ग्राहकांना बसावे लागते. तासन्तास ग्राहकांना बँकेबाहेर बसविले जाते. ग्राहकांना तासन्तास थांबूनही व्यवहार होत नसल्याने ग्राहक व अधिकारी यांच्यामध्ये खडांजगी होण्याचे प्रकार नित्याचेच आहे. बँकेतील अधिकारी व कर्मचारी हे ग्राहकांशी अव्यवहार्य वागत असताना 'कोणाकडेही तक्रार करा, आम्हाला काही फरक पडत नाही,'

असे सांगत ग्राहकांचे अपमान केले जात असल्याच्या घटना दैनंदिन घडत आहे. सेंट्रल बँकेच्या राहुरी शाखेमध्ये ग्राहकांना वाहन पार्किंगची व्यवस्था तसेच बसण्यासाठी व्यवस्था करण्याची मागणी होत आहे. तसेच कर्मचारी व अधिकार्‍यांचा मनमानी करभार थांबवावा, अशी मागणी होत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news