Nagar Crime News : गावठी कट्ट्यासह 4 जणांना अटक

file photo
file photo
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा :  पाच वर्षांपूर्वी मंचर पोलिसांच्या हातातून पळालेल्या गुन्हेगारासह चौघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी टाकळी ढोकेश्वर येथून अटक केली. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, जिवंत काडतूस असा तीन लाख 27 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तुकाराम ऊर्फ राजेंद्र बन्सी वारे ऊर्फ मधे (वय 21, रा. माळवाडी पळशी ता. पारनेर), दीपक मधुकर शिंदे (वय 20), रोशन संपत रोकडे (वय 23, दोघे रा. वडगाव सावताळ, ता. पारनेर), प्रवीण लक्ष्मण दुधावडे (वय 21, रा. अकलापूर घारगाव ता. संगमनेर) अशी आरोपींची नावे आहेत.

तुकाराम वारे त्याच्या साथीदारांसह गावठी कट्टा विक्रीसाठी टाकळी ढोकेश्वर येथे पारनेर फाट्यावर येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळाली. त्यानुसार पोलिस पथकाने सापळा लावला. एक व्यक्ती दुचाकीवर होती व अन्य साथीदार आजूबाजूला उभे होते. पोलिसांनी चपळाईने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे, सोन्याचे दागिने व मोटारसायकल मिळून आली.

ही कारवाई सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, पोलिस कर्मचारी सुनील चव्हाण, दत्तात्रेय हिंगडे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, रवींद्र कर्डिले, भीमराज खर्से, संतोष खैरे, सागर ससाणे, मेघराज कोल्हे, सोनाली साठे, उमाकांत गावडे यांच्या पथकाने केली. आरोपींनी वासुंदे शिवारातील, वडगाव सावताळ व ढोकी (ता. पारनेर) येथील महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. विनाक्रमांकाची दुचाकी मलठण फाटा, शिक्रापुर (ता. शिरुर, जि. पुणे) येथून चोरल्याची कबुली दिली. वारे ऊर्फ मधे राहुरी परिसरातून मंचर पोलिसांच्या हाताला झटका देऊन, दगडफेक करत बेडीसह पळून गेला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news